सामाजिक

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील श्री पिरसाहेब देवाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या चिंचेच्या झाडावर वीज कोसळली !!

1009909313
1009909313

पंचनामा प्रतिनिधी – वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील श्री पिरसाहेब देवाच्या पाठीमागे असलेल्या जवळ-जवळ सहाशे वर्षाच्या जुन्या चिंचेच्या झाडावर रविवार (दि.२१) रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विज पडल्याने चिंचेच्या झाडाला सोमवार ( दि.२२) रोजी पहाटे चिंचेच्या झाडाला आग लागली हे लक्षात येताच फकीरा मूजावर यांनी माजी सरपंच संजय पोखरकर व जायदाबी मूजावर यांना कळविले. त्यांनी त्वरीत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे यांना कळविले.त्यांनी त्वरीत कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व उपाध्यक्ष ॲड.प्रदिप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली पाण्याचा टॅकर घटनास्थळी पाठवला.त्यामुळे चिंचेच्या झाडा वरील आग आटोक्यात आली.

कारखान्याच्या पाण्याच्या टॅकरने दोन फेरे करून आग आटोक्यात आणली. पण विज पडल्याने आग लागली हि आग तेथील नागरीकाच्या लक्षात येई पर्यंत चिंचेच्या झाडाच्या दोन फांद्या जळून खाली पडल्या.मात्र चिंचेच्या झाडाची आग आटोक्यात आल्याने नंदूभाई मुजावर, हनिफ मुजावर, फकीरा मुजावर व ग्रामस्थांनी कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्याक्ष व संचालकांचे आभार मानले.

वीज पडल्याने चिंचेच्या झाडाला आग लागली हे समजताच ग्रामस्थांनी श्री पिराच्या दर्गाजवळ येऊन चिंचेच्या झाडाची पहाणी केली.

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथे श्री पिरसाहेब देवाच्या पाठीमागे असणार्या चिंचेच्या झाडाला लागलेली आग.

1009828025
1009828034

Related posts

श्री भैरवनाथ पतसंस्थेची ३७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या शनिवार दिनांक २९ ऑगस्ट २०२६ रोजी होणार संपन्न !!

Chief Editor

आळंदीमध्ये इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली !!

Chief Editor

७९ व्या संत समागमाच्या सेवांचा मंगलमय शुभारंभ, सेवा ठरली समर्पणाची साधना !!

Chief Editor

Leave a Comment