सामाजिक

लोणी (धामणी) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशाले मध्ये उत्साहात संपन्न झाला आंतरराष्ट्रीय योग दिवस !!

1009909977
1009909977

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव) येथील श्री भैरवनाथ विद्याधाम प्रशाला लोणी व माजी विद्यार्थी विकास प्रबोधनी संचलित प्री स्कूलमध्ये योग प्रशिक्षक डॉ. भास्कर भोसले व मुख्याध्यापक एस बी थोरात सर यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.

आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे.भारतीय धर्म संस्कृतीमधील “योग” संकल्पनेची मांडणी श्रीमदभगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे.याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे.

जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने होते.

1009828026
1009850407

Related posts

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील श्री पिरसाहेब देवाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या चिंचेच्या झाडावर वीज कोसळली !!

Chief Editor

कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे शेतकऱ्यांची अभ्यास सहल संपन्न !!

Chief Editor

माळशेज घाटामध्ये करांजले गावच्या हद्दीमध्ये रस्ता खचला ;आळेफाटा कडून कल्याण कडे जाणारी अहिल्यानगर कल्याण महामार्गावरील वाहतूक बंद !!

Chief Editor

Leave a Comment