सामाजिक

लोणीत बेकायदेशीर खडी क्रशरविरोधात सोमवारपासून आमरण उपोषण !!

1011164070

जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी व प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पुरावे देऊनही कारवाई न झाल्याचा आंदोलकांचा आरोप

पंचनामा प्रतिनिधी लोणी – आंबेगाव तालुक्यातील लोणी गावात सुरू असलेले बेकायदेशीर खडी क्रशर बंद करावे, तसेच संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बाधित शेतकरी व लोणी ग्रामस्थांच्या वतीने सोमवार (दि. ५) ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालय, लोणी येथे आमरण उपोषण करण्यात येणार आहे.

लोणी गावातील बेकायदेशीर खडी क्रशर बंद करण्याबाबत तसेच बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबत प्रशासनाकडे वारंवार मागण्या करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भातील पुरावे देऊनही अद्याप अपेक्षित कारवाई झालेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. यामध्ये लोणी गावातील बेकायदेशीर खडी क्रशर तातडीने बंद करावे, बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करावी, खोट्या बोगस ग्रामपंचायत ठरावावर मिळविलेले प्रदूषण मंडळाचे परवाने रद्द करून कारवाई करावी, दोषी व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, या मागण्यांचा समावेश आहे.

या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा बाधित शेतकरी व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. मागण्यांवर ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Related posts

जुनं ते सोनं ;आमच्या शिरदाळे गावातील धोतर टोपी,नेहरू-पायजमा मधील ही कदाचीत शेवटची पिढी असेल ….!!!

Chief Editor

शिरदाळे येथे भक्तिमय वातावरणात संपन्न झाला श्री हनुमान देवाचा भंडारा !!

Chief Editor

समर्थ अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांत निवड !!

Chief Editor

Leave a Comment