
प्रेम, सेवा आणि समर्पणा द्वारे भक्ती करण्याचे आवाहन….!!
पंचनामा प्रतिनिधी आळेफाटा – (पुणे) निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षा जी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने संत निरंकारी मिशन-पुणे झोन अंतर्गत आळेफाटा संयोजकीय स्तरीय निरंकारी महिला संत समागमाचे आयोजन शुक्रवार, ०३ऑक्टोबर २०२६ रोजी संत निरंकारी सत्संग भवन-आळेफाटा (ता जुन्नर) येथे भक्तिमय वातावरणात करण्यात आले होते. या समागमाला पुणे झोन अंतर्गत येणाऱ्या आळेफाटा सह गंगाधाम, वारजे, भोसरी, चाकण, मांजरी, दौंड, चिखली, निगडी, घोडेगाव, जुन्नर, मंचर, नारायणगाव व संगमनेर शाखांमधील महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून दौंड तालुक्यातील केडगावच्या जेष्ठ प्रचारक संत भगिनी आ.शालनताई हुमेजी या विशेष रुपाने उपस्थित होत्या. आळेफाटा संयोजकीय क्षेत्र संयोजक आ.चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात या समारोहाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी मुख्य मंचावरुन आपले भाव व्यक्त करताना भगिनी आ. हुमेजी यांनी ‘संत निरंकारी मिशन म्हणजे ब्रह्मज्ञान हेच ब्रह्मज्ञान समर्पणानेच सतगुरु द्वारे प्राप्त होते.’ असे प्रतिपादन केले, स्त्रीच्या स्वभावात निरंकाराने त्यागाचा गुण नैसर्गिकरित्या दिलेला असून, ब्रह्मज्ञान प्राप्त झालेली स्त्री प्रेम, सद्भावना आणि सेवाभावनेतून संपूर्ण कुटुंबाला सत्संगाशी जोडू शकते,असे त्यांनी नमूद केले. यावेळी संत निरंकारी मिशनच्या ब्रम्हज्ञान प्रचारक संत भगिनी आ.विना आडवाणीजी देखील आवर्जून उपस्थित राहून जवळपास ३० नवीन भाविक, जिज्ञासू भगिनींनी हे दिव्य ब्रम्हज्ञान प्राप्त केले.
संत निरंकारी मिशनच्या कार्यासाठी अनेक महिलांनी त्याग केला असून प्रेम, सद्भावना आणि सेवेतून सतगुरुंना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करावा, असे देखील आवाहनही त्यांनी केले. ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून निरंकार प्रभूच्या इच्छेत संतुष्ट राहण्याची शिकवण ही सद्गुरूंनी दिलेली मोठी देणगी असल्याचे त्यांनी सांगितले. प्रेम भावनेशिवाय भक्तिची कल्पना करता येणार नाही आणि समर्पणाशिवाय प्रेम उपजणे शक्य नाही असे सांगून उत्तम भक्त होण्यासाठी मनातील भ्रमातून बाहेर येणे आणि सद्गुरूंच्या प्रति आपला विश्वास कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले,
या महिला संत समागमा दरम्यान विविध शाखांमधील महिलांनी मराठमोळ्या पोशाखात हजेरी लावली व गीत, कविता तसेच विचार द्वारे आपले मनोगत व्यक्त करून सद्गुरूंच्या चरणी आपला भक्तिभाव समर्पित केला. दरम्यान वेगवेगळ्या सादरीकरणातून एकता, प्रेम आणि समर्पणाचा संदेश देखील देण्यात आला. शेवटी सर्वांचे आभार स्थानिक आळेफाटा महिला संयोजकीय क्षेत्र समन्वयक भगिनी आ.मनीषाताई थोरात यांनी मानले.


