सामाजिक

भैरवनाथ पतसंस्थेकडून ५ कोटी २५ लाखांचे वाहन कर्जवाटप ; दिवाळीच्या सणासुदीत ७३ चारचाकी व दुचाकी वाहनांचे वितरण ; सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्थेचा पुढाकार !!

1011716333

पंचनामा प्रतिनिधी – मा. खासदार तथा भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेची यशस्वी वाटचाल सुरू आहे. यंदाच्या दिवाळी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या वतीने सभासदांना मोठी भेट देण्यात आली असून, तब्बल ५ कोटी २५ लाख ६९ हजार रुपयांचे वाहन कर्जवाटप करण्यात आले आहे. या माध्यमातून ७३ चारचाकी व दुचाकी वाहनांचे वितरण करण्यात आले.

1011716603

आंबेगाव तालुक्यातील पारगाव येथील भैरवनाथ पतसंस्थेच्या शाखेत मान्यवरांच्या हस्ते वाहनांचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक हनुमंत तागड, पूर्व भागाचे विभागीय अधिकारी संतोष पाचपुते, शाखाधिकारी शालिवान गव्हाणे, बजरंग देवडे, मारुती पोंदे, काळूराम लोखंडे यांच्यासह संस्थेचे सभासद, खातेदार व कर्मचारी उपस्थित होते.

1011716321

भैरवनाथ पतसंस्था नेहमीच सभासदांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात देत असते. नैसर्गिक आपत्ती किंवा वैयक्तिक अडचणीच्या प्रसंगी संस्थेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लावला जातो. संस्थेची हीच सभासदाभिमुख भूमिका कायम असल्याचे संस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे यांनी सांगितले.

1011716331
1011716325

भक्कम आर्थिक स्थितीमुळे विश्वासार्ह वाटचाल

संस्थेची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस भक्कम होत असून, संस्थेची एकूण गुंतवणूक २७९ कोटी ७५ लाख रुपये आहे. संस्थेकडे ६८५ कोटी ८० लाख रुपयांच्या ठेवी असून, आजपर्यंत ५२९ कोटी २७ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.

संस्थेच्या विविध शाखांमध्ये वीजबिल भरणा केंद्रांसह एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, एसएमएस सुविधा, कोअर बँकिंग प्रणाली, क्यूआर कोड, सेफ डिपॉझिट लॉकर तसेच मोबाईल ॲप आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संस्थेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश खरमाळे यांनी माहिती दिली.

1011716327
1011716322

सभासदांचा विश्वास संपादन करत आर्थिक व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

1011713598

Related posts

ज्योती गोरडे यांना स्वामी विवेकानंद युवा उद्योजक पुरस्कार जाहीर !!

Chief Editor

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी जगदीश हिरेहब्बू

Chief Editor

लोणावळ्यातील ‘ग्लास स्कायवॉक’च्या निविदेचा मसुदा अंतिम; निविदा प्रसिद्धीचा मार्ग मोकळा !!

Chief Editor

Leave a Comment