सामाजिक

श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या उत्सव समिती अध्यक्षपदी जगदीश हिरेहब्बू

1010756782

सोलापूर : बाळीवेस येथील श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या सन २०२६-२७ च्या उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जगदीश हिरेहब्बू यांची एकमताने निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सुभाष (मामा) गुंदगी, शिवानंद सोन्ना व अजय येळमेली, तर सचिवपदी पुष्कराज मेत्री यांची निवड झाली.

मंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. श्री मंदिरात झालेल्या सभेच्या प्रारंभी मंडळाचे विश्वस्त व खजिनदार केदार मेंगाणे यांनी वर्षभरातील कामकाजाचा अहवाल सादर केला.

वार्षिक सर्वसाधारण सभेचे स्वागत व सूत्रसंचालन ट्रस्टी सचिव मल्लिनाथ खुने यांनी केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना खुने म्हणाले की, श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाला मोठी ऐतिहासिक व धार्मिक परंपरा लाभली आहे. गणेशोत्सवाबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची मंडळाची परंपरा आहे. शांततापूर्ण व शिस्तबद्ध मिरवणूक, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि समाजोपयोगी कार्यामुळे मंडळाने सोलापूरकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. यंदाही ही परंपरा अधिक भक्कम करत भक्तिमय, शिस्तबद्ध आणि सामाजिक संदेश देणारा गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

नूतन उत्सव समिती अध्यक्ष जगदीश हिरेहब्बू यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंडळाची ऐतिहासिक परंपरा व सामाजिक बांधिलकी कायम ठेवत यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले. नाविन्यपूर्ण मिरवणूक, विविध सामाजिक उपक्रम तसेच गणेशभक्तांसाठी विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येणार असून उत्सव काळात शिस्त, शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नूतन उत्सव समिती अध्यक्ष जगदीश हिरेहब्बू यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. मंडळाचे माजी उत्सव अध्यक्ष बाळासाहेब मुस्तारे यांच्या हस्ते हिरेहब्बू यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी ट्रस्टी अध्यक्ष सोमनाथ भोगडे, ट्रस्टी उपाध्यक्ष प्रकाश वाले, ट्रस्टी सचिव मल्लिनाथ खुने, ट्रस्टी खजिनदार केदार मेंगाणे, विश्वस्त मल्लिनाथ मसरे, गुरुलिंग समाणे, शिवशंकर कोळकूर, शिवानंद बुगडे, सुधीर थोबडे, नागनाथ मेंगाणे, शशिकांत बिराजदार, शिवराय समाणे, लक्ष्मण भाईकट्टी, प्रविण वाले, शिवलिंग माळगे, विकास धुम्मा, सचिन गुंगे, गुरुशांत मोकाशी, अमर चव्हाण, संजय बिराजदार आदींसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कसबा गणपती मंडळाचे नूतन पदाधिकारी (२०२६-२७)

  • उत्सव अध्यक्ष : जगदीश हिरेहब्बू
  • उपाध्यक्ष : सुभाष (मामा) गुंदगी, शिवानंद सोन्ना, अजय येळमेली
  • सचिव : पुष्कराज मेत्री
  • खजिनदार : केदार मेंगाणे
  • मिरवणूक प्रमुख : सोमनाथ मेंगाणे, अनिल मसरे, अमित गुंगे, योगीराज भोगडे, प्रशांत धुम्मा
  • लेझीम प्रमुख : कैलास मेंगाणे, महेश बुगडे, केतन भोगडे, कृष्णा सुरेराव, योगेश हदरे
1010756749
1010755876
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 379001

Related posts

परिवर्तनाच्या प्रेरणा जागविणारे लोकमान्य टिळक : अण्णाभाऊ साठे यांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान आजही प्रेरणादायी – प्रा. राजीव सावंत

Chief Editor

चिमुकल्यांच्या उत्साही प्रवेशाने गजबजल्या शाळेच्या वर्गखोल्या !!

Chief Editor

मैत्री म्हणजेच आभाळाला पडलेलं सोनेरी स्वप्न..मैत्री म्हणजेच नवरत्नाच्या हारातील “अनमोल रत्न”..!”

Chief Editor

Leave a Comment