
पंचनामा प्रतिनिधी नाशिक – बागलाण तालुक्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व तालुक्यात घरपोच गॅस वितरण सेवा सुरू करावी व तशा आशयाचे पत्र प्रशासनाने गॅस एजन्सींना द्यावे अशा आशयाचे निवेदन बागलाण तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सटाणा तहसीलचे नायब तहसीलदार माखरे यांना दिले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की बागलाण तालुक्यात मेघ गर्जनेसह अवकाळी वादळी पावसाने गारपीटीने जोरदार हजेरी लावल्याने शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेला कांदा, गहूपिके, द्राक्ष, डाळिंब तसेच भाजीपाला पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी संपूर्णहंगामी उत्पन्न नष्ट झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसगांने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला आहे. बि-बियाणे, खते, औषधे, मजुरी पांच्या वाढत्या भावामुळे व शेतमालाला समाधानकारक भाव नसल्याने शेतकरी आधीच मेटाकुटीला आला असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी घेतलेली पिके नष्ट झालेली आहेत. समाधानकारक पिकांची अपेक्षा असतांना गारपीटीमुळे सर्व काही उध्वस्त झाले आहे. शेतकऱ्यांना मोठी आर्थिक झळ बसली आहे. तरी शासनाने कृषी खात्याने त्वरीत वस्तुनिष्ठ पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ आधिक मदत द्यावी व पंचनाम्यांची वाट न पहाता अंतरिम मदत देऊन नुकसान भरपाईचे दर वाढवून तात्काळ मदत मिळावी व बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनीही तातडीने लक्ष घालून शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
तसेच आखाती युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत झाला असला तरी तालुक्यातील गॅस ग्राहकांना एजन्सीवर जाऊन सिलेंडर घ्यावे लागत आहे परंतु जर एजन्सीवर सिलेंडर उपलब्ध नसले तर मात्र ग्राहकांना चकरा माराव्या लागतात त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप होतो तरी याची त्वरित प्रशासनाने दखल घेऊन गॅस सिलेंडर घरपोच सेवा पुन्हा सुरू करावी व तशा आशयाचे पत्र एजन्सींना प्रशासनाने द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी शामकांत लोखंडे, मनोहर भामरे, किशोर जाधव, दिलीप खैरनार, विलास सोनवणे, सुनील पंडित, नितीन रौंदळ, राजेंद्र खैरनार, धनंजय धोंडगे, अशोक पाटील, किशोर बोरसे, गोरख बच्छाव व शेतकरी बांधव उपस्थित होते.

बागलाण तालुका अखिल भारतीय ग्राहक पंचायत तर्फे मा.नायब तहसीलदार माखरे साहेब यांना निवेदन देण्यात आले
आज सोमवार दिनांक 6 एप्रिल 2026 रोजी दुपारी पावणे बारा वाजता निवेदनातील पहिला विषय बागलाण तालुक्यात नुकत्याच झालेल्या गारपीट वादळी पावसामुळे जे शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई त्वरित मिळणे बाबत व दुसरा विषय गॅस एजन्सींकडून गॅस ग्राहकाला घरपोच सिलेंडर मिळणे बाबत
(वृत्त संकलन, छायाचित्र – भूषण चोबे)


