सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथील घोड नदीवरील पुलाचे कठडे तुटल्याने वाहतूक धोक्यात; सार्वजनिक बांधकाम विभागाने कठड्यांची दुरुस्ती करावी !!

img 20260407 wa0620

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यात अष्टविनायक महामार्गालगत पारगाव गावठाणाच्या अलीकडे असलेल्या घोड नदीवरील पुलाची अवस्था दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. पुलाच्या एका बाजूचे कठडे तुटल्याने येथील वाहतूक प्रवाशांसाठी धोकादायक बनली असून अपघातांची शक्यता प्रचंड वाढली आहे.

पारगाव परिसरातील नागरिकांकडून आणि स्थानिक जनप्रतिनिधींकडून वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. मागील काही महिन्यांत या पुलावर घडलेल्या अपघाती घटना परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित करतात.

मागील महिन्यात येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू असताना ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर कठडे नसल्याने घोड नदीच्या पात्रात कोसळला असता. चालकाच्या चातुर्यामुळे आणि काही नागरिकांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. त्यापूर्वी एक स्कॉर्पिओ गाडीही पुलावरून घसरून थेट नदीपात्रात कोसळली होती. या घटना पुलाचे संरक्षण कठाडे तुटल्याने झाल्या आहेत.

पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे आणि ग्रामपंचायत सदस्य काळुराम लोखंडे यांनी या गंभीर समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तातडीने कठडे बसवून पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. “वाहतूक वाढत असताना व पुलावरील कठडे ढासळलेले असताना मोठा अपघात होण्याची शक्यता टाळण्यासाठी त्वरित कारवाई करणे अपरिहार्य आहे,” असे मत ढोबळे यांनी व्यक्त केले.

स्थानिक नागरिकांचाही संयम सुटत चालला आहे. रोजचे कामधंदे, शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी आणि ऊस वाहतूक करणारी वाहने या पुलाचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. कठडे नसल्याने अंधारात, पावसाळ्यात किंवा वाहन घसरल्यास थेट नदीपात्रात पडण्याचा धोका संभवतो.

पारगावकरांनी एकमुखी मागणी केली आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन पुलाची आवश्यक दुरुस्ती करावी आणि वाहतूक सुरळीत व सुरक्षित करावी.

img 20260407 wa0620

पारगाव (ता.आंबेगाव) येथील घोडनदी वरील पुलाचे कठडे तुटल्याने वाहतूक धोक्याची बनली आहे.

fb img 1774661449199

Related posts

ग्रामपंचायत जवळेचा अभिनव उपक्रम; एकल महिलांसाठी संपन्न झाला हळदी कुंकवाचा समारंभ!!

Chief Editor

पंचनामा विशेष – अशी कला, असे कलावंत – अभिनय सम्राट सूर्यकांत विरळीकर साभार लेख – राजेंद्र डी. मोरे

Chief Editor

धामणी (लोणी) च्या वेदमूर्ती मंदार क्षिरसागर यांना ॠग्वेद पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

Leave a Comment