सामाजिक

शिरदाळे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या पाटोदा गावाला भेट !!

img 20260407 wa0618

पंचनामा प्रतिनिधी – शिरदाळे (ता.आंबेगाव) येथील ग्रामपंचायतीच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांनी राज्यात प्रसिद्ध असलेल्या पाटोदा गावाला भेट दिली.आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या संकल्पनेतून उभे राहिलेल्या आदर्श गाव पाटोदा गावचा आदर्श भविष्यात आपल्या शिरदाळे गावामध्ये राबवण्याचा दृष्टीने ही भेट यशस्वी ठरणार आहे.

img 20260407 wa0606

यावेळी स्वतः पेरे पाटील त्या ठिकाणी उपस्थित नव्हते परंतु दूरध्वनीवरून संपर्क केला असता तुमच्या गावाला लवकरच भेट देण्यासाठी येणार असल्याचे सरपंच पेरे पाटील यांनी सांगितले.

सुसज्ज ग्रामपंचायत इमारत,गावात केलेल्या कामांचा लेखाजोखा, ग्रामपंचायत कामकाज या सर्व गोष्टी अतिशय अनोख्या पद्धतीने नियोजित केलेल्या आहेत.त्यामुळे गावाची बांधणी तसेच गावातील सुसूत्रता आणि एकंदरीत सर्वच व्यवहार आदर्श असल्याचे या भेटीत पाहायला मिळाले.

img 20260407 wa0601

यावेळी सरपंच मनोज तांबे,उपसरपंच बिपीन चौधरी,मा.सरपंच गणेश तांबे,मा.सरपंच राजेंद्र चौधरी,सोसायटी संचालक जयदीप चौधरी हे मंडळी उपस्थित होते.

img 20260407 wa0599
img 20260407 wa0597
fb img 1774661449199

Related posts

जवळे ग्रामपंचायतीची जिल्हा परिषद सी.ई.ओ कडून पाहणी !!

Chief Editor

आणि…पाचपुते कुटुंबाचे क्षणात होत्याचे नव्हते झाले;जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथे पावसाचा हाहाकार; अवघ्या काही मिनिटांत कोसळला ढगफुटी सदृश पाऊस !!

Chief Editor

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाची सतर्कता; ३० जणांची सुटका,२७० हून अधिक नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर !!

Chief Editor

Leave a Comment