सामाजिक

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे श्री शंभू महादेवाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात संपन्न !!

img 20260307 wa0141

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील शिरदाळे या ठिकाणी गुरूवार दि. ५ मार्च २०२६ रोजी शंभू महादेवाची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी गावातील दानशूर भाग्यवान मंडळींनी मोठ्या उदार अंतकरणाने मोठ्या स्वरूपात आर्थिक मदत केली.

बुधवार दि. ४ मार्च २०२६ रोजी मंदिरात जुन्या मूर्तीची उत्थापना आणि होमहवन धामणी गावचे भूषण मा. श्री.प्रमोद काका देखणे यांच्या उपस्थित करण्यात आले,तर गुरूवार दु. ५ मार्च २०२६ रोजी दुपारी ठीक १२.३० मिनीटांनी नवीन मूर्तींची प्राणप्रतिष्ठा सर्व ग्रामस्थ महिला भगिनींच्या उपस्थिती मध्ये करण्यात आली.

img 20260307 wa0140

सायंकाळी ठिक ४ ते ५ या वेळेमध्ये ह. भ. भास्कर महाराज पवार ( आळंदी) देवाची यांची प्रवचन सेवा, हरिपाठ तसेच सायंकाळी ठिक ६.०० ते ८.०० या वेळेमध्ये ह. भ. प. आदिनाथ महाराज जुन्नरककर यांची किर्तनसेवा संपन्न झाली.

किर्तनसेवा झाल्यानंतर उपस्थित सर्व ग्रामस्थ, महिला भगिनी त्याचप्रमाणे पाहुणे मंडळीसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन दोन्ही दिवस करण्यात आले होते.

या कार्यक्रमाची सांगता श्री. हनुमान प्रासदिक भजनी मंडळ यांच्या भजनाने झाली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह. भ. प. तान्हाजी महाराज तांबे, श्रीशंकर द. तांबे, श्री बाळासाहेब तांबे, श्री. वसंत तांबे, श्री. हनुमंत तांबे, श्री. संतोष तांबे यांनी अथक प्रयत्न केले.

fb img 1771121534243

Related posts

अन् अजितदादा पवार तमाशा कलावंत शांताबाई ला नम्रपणे नमस्कार करतात !!

Chief Editor

२१ किलोमीटर गटात आश्लेषा झोलेकर, निलेश यादव यांची विजयी दौड,लोणी मॅरेथॉन २०२६ चौथे पर्व उत्साहात संपन्न !!

Chief Editor

हरवले आहेत – श्री.एकनाथ देवराम सुक्रे (आचारी) वय ६० वर्ष राहणार खडकवाडी, लोणी ता.आंबेगाव,जिल्हा पुणे

Chief Editor

Leave a Comment