सामाजिक

धामणीच्या खडकाळ माळरानावर नंदनवन फुलवणारा किमयागार किशोर बापू विधाटे !!

img 20260307 wa0361
img 20260307 wa0358

पंचनामा संपादकीय – शब्दांकन श्री. मोहन वामने
8087459030

! झाडें जगवा !

किशोर बापू विधाटे, माझा आज तगायत मैत्री जपलेला बालमित्र…!
दहावी नंतर ठाण्याला, “इनार्को इंडिया प्रा ली. ” मध्ये अनेक वर्ष जॉब केलेला, कंपनी बंद पडल्यानंतर मागील पाच वर्षापर्यत रिक्षा व्यवसाय केलेला मित्र….!

आईवडील निवर्तल्यानंतर आमच्या धामणी मधील त्याच्या घरच्या शेतीची जबाबदारी स्विकारून वयाच्या साठीत, स्वतःला “जातिवंत शेतकरी “सिद्ध करणारा माझा मित्र….!

हल्ली नेहमीच “आवर्षण प्रवण क्षेत्र ” असणारे आमचं धामणी तेथील किशोर च्या खडकाळ माळरानावर,
“नंदनवन “फुलवणारा माझा मित्र….!

मागील पाच वर्षांपूर्वी याच खडकाळ जमिनीवर शंभर, केशर आंब्याची झाडं लावलेला माझा मित्र….!

तीव्र इच्छाशक्ती आणि अपार कष्टाच्या बळावर,खडकाळ माळरांनावर अपुरा पाऊस आणि पाणी पुरवठा यावर इतकं मोठं ” शेत साम्राज्य ” टिकवून ठेवणारा माझा मित्र….!

img 20260307 wa0360

तीनचार महिने अधूनमधून पडणारा पाऊस, त्यानंतर दोन तीन महिने वाहणारे ओढ्यावरील पाणी, पुढील चार महिने केवळ, “टँकर “, च्या साहाय्याने दहा ते बारा हजार रुपये एक टँकर प्रमाणे खर्च करुन मिळवलेलं पाणी यावर शेती करणारा माझा मित्र…!

शेती साठी अपार कष्ट करणाऱ्या या माझ्या मित्राला आपल्या सामाजिक जीवनाची सुद्धा जाणीव आहेच. क्रांतिज्योती शिक्षण व आरोग्य संस्था आणि श्री संत शिरोमणी सावता माळी विकास मंडळाच्या माध्यमातून सर्वं समाजासाठी काम करणारा माझा मित्र….!

आसपासच्या अनेक शेतकरी वर्गाने आपल्या कमाईतील कवडी कवडी जमवून जवळच्या पारगाव येथील नदीतून पाईप द्वारे पाणी आणण्याची योजना शासन दरबारीं अनेक वर्ष पडून आहे….!

img 20260307 wa0359

या योजनेसाठी शासनाकडून खर्च होणं अपेक्षित असताना गावातील शेतकरी वर्गाने लाखो रुपयांचा निधी जमवून योजना कार्यान्वित केलेली असताना. केवळ वीज कनेकशन बाकी असलेला गावाच्या दृष्टीने मोठा प्रकल्प पडून आहे त्यासाठी नुकतेच गावात शेतकरी उपोषणास बसलेले होते त्या उपोषण कर्त्या पैकीच एक असणारा माझा मित्र….!

शासनाच्या अनेक ” मोफत ” योजनावर आता करोडो रुपये खर्च होतं असताना केवळ वीज जोड करण्यासाठी परवानगी देणं शासनाच्या हातात राहिलेलं आहे त्यासाठी जर शासना कडून चाल ढकल होतं असेल तर या बळी राजाने जगावं तरी कसं? की नेहमीच केवळ पाण्याच्या टँकर साठी वार्षिक 50000/- रुपये खर्च करुन आहे ती शेती फुलवावी….?

आज गरज आहे या माझ्या मित्रा सारख्याच अनेक मित्रांच्या शेती टिकविण्याची.

शासनाने आता या बळीराज्यांच्या जीवाचा आणि नंदनवन ठरू पाहणाऱ्या शेतीचा अंत न पाहता, “आवश्यक त्या परवानग्या देण्याची.”…..!

अशीच आमच्या धामणी गावातील खडकाळ माळरांनाचं नंदनवन करू पाहणाऱ्या माझ्या असंख्य मित्रांना माझा मानाचा मुजरा….!

या खडकाळ माळरानाचं शाश्वत शेतीत रूपांतर व्हावं, त्यासाठीच कष्ट घेतलेल्या अनेक कष्टकऱ्या बळीराजाना समाधान सुखं शांती मिळावी यासाठी. यामुळे नक्कीच पर्यावरण समतोल साधला जाईल, “पाणी जिरवा झाडं लावा ” हे शासकीय स्लोगन प्रत्यक्षात उतरेल आणि त्यातून ऊर्जा घेऊन करोडो शेतकरी यासाठी पुन्हा नव्याने प्रयत्नाला लागतील….!

शासन नक्कीच प्रयत्नशील असेल याची खात्री आहेच….!

fb img 1771121534243

Related posts

शासनाच्या वीज पुरवठा न देण्याच्या धोरणाविरुद्ध धामणीकरांचा एल्गार !!

Chief Editor

लोणी (धामणी) येथे महाशिवरात्र यात्रा उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; मंगळवार दि.१७ व बुधवार दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार!!

Chief Editor

आंबेगाव तालुक्यातील काठापूर बुद्रुक गावातील तरुणांनी जपली ७० वर्षांची नाट्य परंपरा!!

Chief Editor

Leave a Comment