सामाजिक

अशी कला असे कलावंत – हार्मोनियम मास्टर विठ्ठल भोसले

img 20260408 wa0214

पंचनामा प्रतिनिधी – संगिततज्ञ मा. विठ्ठल भोसले सोनवडीकर ता. फलटण जि. सातारा यांची मुलाखत घेतली असता ते म्हणाले की,
१९९२ सालात एस. वाय .ची परीक्षा त्यांनी दिली आणि वडीलां सोबत दत्तोबा तांबे तमाशा मंडळ मध्ये तमाशा क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. वडील शिवराम भोसले आंभेरीकर नामांकित ढोलकी पटू होते, त्यांच्या हाताखाली कलेचा वारसा घेऊन विठ्ठलराव हार्मोनियम वादक झाले.
त्यानंतर त्यांचा प्रवास कीबोर्ड प्लेयर म्हणूनच सुरू झाला. नंतर ते अनेक नामांकित तमाशाफडात काम करून आता ते कार्यरत नांदवळकर तमाशा मंडळामध्ये आहेत.

मा.विठ्ठल भोसले यांनी प्रत्येक तमाशा फडांमध्ये तीन-चार तीन-चार वर्षे अतिशय प्रभावी प्रामाणिकपणे काम केलेले आहे .तसेच शासकीय कार्यक्रमांमध्ये मुंबईचे कार्यक्रम ,जेजुरीचे कार्यक्रम, घोडे माळेगावचे कार्यक्रम व धुमाकूळ आर्केस्ट्रा बारामती या संचात काम केलेले आहे.

मा.विठ्ठल भोसले बोलताना म्हणाले की,तमाशाकला रसिकसेवा हीच ईश्वर सेवा आहे . मनोभावे केली पाहिजे.वीस पंचवीस वर्षांपूर्वीचा तमाशा आणि आत्ताचा बदललेला तमाशा यात सादरीकरणात बराच फरक पडलेला आहे .आता इलेक्ट्रॉनिक वाद्यामुळे कॉफी टू कॉपी सादरीकरण करता येतं. आधुनिक साऊंड सिस्टिममुळे कानाला आणि पाहायला छान वाटतं.तरी कुठेतरी तमाशाचा जुना बाजाचा विसर पडल्यासारखा वाटतो आहे .याची खंत वाटतेय.

मा. विठ्ठल भोसले हे कलेचे जाणकार
कलावंत असल्यामुळे , आवडीनुसार भजन ,पंढरीची वारी, बँडबँजो यांमध्ये सामील होत असतात.तसेच भोसले हे कलावंत म्हणून जगत असताना कुटुंबाच्या प्रगतीकडे व सर्व बाबींकडे चांगले लक्ष देऊन मुली ,मुलांची लग्न करून ते त्यांच्या प्रपंचात सुखी आहेत . कलेतून कष्टाचा पैसा प्रपंचासाठी सार्थकी लावून प्रपंच्यात सुखाचा चंद्रप्रकाश पाडलेला आहे. दिवसरात्र दगदग करून कष्टातून मिळवलेला पैसा व्यर्थ नाही गेला पाहिजे, असे भोसले यांचे मत आहे

मा.विठ्ठल भोसले पुढे म्हणाले की,
चांगला हार्मोनियम वादक होण्यासाठी रियाज नवीन येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू यांची वस्तुस्थिती वापरण्याची माहिती असणे गरजेचे आहे .तमाशाकलेविषयी आत्मीयता आणि विश्वास या दोन्ही गोष्टीस स्वतः कलावंत म्हणून मी पात्र राहिले पाहिजे असा माझा संकल्प असतो. तेथे मी कुठेही कमी पडत नाही. कला हीच कलावंताची मोठी श्रीमंती आहे पैसा येतो आणि जातो. कलेचे पवित्र पाळणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतःच्या कलेवर लक्ष ठेवणे हे सर्वात मोठे काम आहे.

मा.विठ्ठल भोसले ,पुढे म्हणाले की,
तमाशा कला वाचवायची असेल, प्रगतीपथावर न्यायची असेल तर नवीन येणाऱ्या कलावंताला सांभाळून घेत, त्यांना समजून सांगून पारंपरिक कलेची माहिती करून देणे हे अत्यंत गरजेचे असून ,कलावंताने कलावंत घडवला पाहिजे यासाठी ज्येष्ठ कलावंताचे योगदान महत्त्वाचे.

तमाशा कलेस स्वतःची मीठ भाकर समजणाऱ्या, कलेसाठी झटणा-या
एका गुणी ज्ञानसंपन्न, कलेवर प्रेम करणाऱ्या मा.विठ्ठल भोसले या संगीततज्ञ कलावंतांशी बोलताना खूप समाधान वाटलं

मीपणा ,मी मारला, गाडला
   तेव्हा माझा मी झालो

आज कलेच्या चंद्र प्रकाशात
मी उजाळून निघालो

  मी काल कुणीच नव्हतो 
    आज कोणीतरी आहे 
  कलेची सुंगधी सुंदर फुले 
     अंगावर पडत आहे

(मा. बाळासाहेब विरळीकर यांचे आभार)

     राजेंद्र.डी.मोरे, बारामती
img 20260408 wa0202(1)
fb img 1774661444136

Related posts

विज्ञान दिनानिमित्त खोडद येथील ‘जीएमआरटी’ प्रकल्पास पारगाव (शिंगवे ) येथील विद्यार्थ्यांची भेट !!

Chief Editor

धामणी (लोणी ) येथे रंगला विठ्ठल नामाचा जयघोष !!

Chief Editor

Chief Editor

Leave a Comment