सामाजिक

लोणी (धामणी) येथे महाशिवरात्र यात्रा उत्सवानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन; मंगळवार दि.१७ व बुधवार दि.१८ फेब्रुवारी २०२६ रोजी रंगणार बैलगाडा शर्यतीचा थरार!!

img 20260211 wa0800
img 20260211 wa0801

पंचनामा लोणी (धामणी) प्रतिनिधी -आंबेगाव तालुक्यातील सर्वार्थाने प्रगतशील गाव म्हणून ओळख असणाऱ्या लोणी ( ता.आंबेगाव) येथे महाशिवरात्र यात्रा निमित्त रविवार ( दि.१५) रोजी विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.त्यानिमित् सकाळी ९ ते १० वाजता देवास हारतुरे व मांडव डहाळे, दिंडी सोहळा व रात्री सात वाजता छबीना व पालखी मिरवणूक तसेच मंगळवार ( दि.१७ ) व बुधवार (दि.१८ मार्च) रोजी सकाळी नऊ ते सहा वाजता बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे.त्यासाठी एकूण इनाम २,७५,१११/ रुपये, चार एलसीडी, दोन भव्य ट्रॉफी, दोन कुलर, दोन टॉवर फॅन, चार फ्रिज, एक जूपता बैलगाडा, आठ फवारणी पंप व बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक येणाऱ्या गाड्यास १००००१/, व्दितीय क्रमांक ७१००१/ रुपये, तृत्तीय क्रमांक ४१००१/ रुपये, चतुर्थ क्रमांक २५००१ रुपये, व विशेष आकर्षक फायनलसाठी प्रथम क्रमांकास ३१००१/ रुपये, व्दितीय क्रमांकास २१००१/ रुपये, तृतीय क्रमांकास ११००१/ रुपये, चतुर्थ क्रमाकांस ७००१/ रूपये अशी आकर्षक बक्षिसे ठेवली आहेत.

तसेच घोडयांच्या भव्य शर्यतीसाठी प्रथम क्रमांक १५०१/ रुपये, व्दितीय क्रमांक-१००१/ रुपये, तृत्तीय क्रमांक ७५१/ रुपये

बैलगाडयाच्या शर्यती साठी टोकन रविवार ( दि.१५) रोजी सकाळी १२ ते ०२ वाजता महादेव मंदिर येथे काढले जातील.यावेळी गाडा मालकांना भोजन व्यवस्था केली आहे. टोकन फी दोन हजार रूपये राहील व गाडा सोडतेवेळी १५००/ रूपये परत केले जातील.

तसेच बुधवार (दि.१८) रोजी रात्री दहा वाजता पांडूरंग मुळे सह तुकाराम खेडकर मांजरवाडीकर यांचा लोकनाटय तमाशाचा कार्यक्रम होईल.

fb img 1769478999823

या महाशिवरात्र यात्रेची शोभा वाढवण्यासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थ लोणी यांनी केले आहे.अशी माहिती ग्रामस्थांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Related posts

आदर्श माध्यमिक विद्यालय जारकरवाडी येथे ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय शाखा पारगाव यांच्या माध्यमातून व्यसनमुक्ती,मोबाईलच्या अतिवापरासह व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात साजरा !!

Chief Editor

ज्योती गोरडे यांना स्वामी विवेकानंद युवा उद्योजक पुरस्कार जाहीर !!

Chief Editor

Leave a Comment