सामाजिक

परसबागेत फुलतेय शेतीची शाळा; डांगर भोपळ्यातून विद्यार्थ्यांना कृतीतून शिक्षण !!

1011108910

पंचनामा प्रतिनिधी – पुस्तकातील शेतीचे धडे वाचण्यापेक्षा माती हातात घेऊन पिकांची वाढ अनुभवण्याची संधी पुणे मॉडेल स्कूल शेवाळवाडी-मंचर (ता.आंबेगाव) येथील विद्यार्थ्यांना मिळत आहे. शाळेच्या परसबागेत सध्या डांगर भोपळ्याचे पीक बहरले असून, या हिरवाईतून विद्यार्थ्यांना शेती, पोषण आणि पर्यावरणाचे प्रत्यक्ष धडे मिळत आहेत.

शाळेच्या परसबागेत केवळ डांगर भोपळाच नव्हे, तर यापूर्वी फणस,पपई,नारळ, केळी,जांभूळ,सीताफळ यांसारखी फळझाडे तसेच वांगी,मिरची,टोमॅटो,भेंडी, रताळी,मुळा,गाजर,बीट आणि वाल अशा विविध भाजीपाला पिकांची लागवड करण्यात आली आहे.या परसबागेतून मिळणाऱ्या ताज्या उत्पादनाचा उपयोग विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहारासह पूरक आहारासाठी केला जात आहे.

बी पेरण्यापासून रोपांची निगा राखणे, पाणी देणे, पिकांची वाढ पाहणे आणि काढणीपर्यंतच्या प्रक्रियेत विद्यार्थी प्रत्यक्ष सहभागी होत आहेत. त्यामुळे शेती ही केवळ पुस्तकातील संकल्पना न राहता त्यांच्या अनुभवाचा भाग बनत आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेणे, पाण्याचा योग्य वापर करणे आणि स्थानिक पातळीवर उपलब्ध ताज्या अन्नाचे महत्त्व याचीही विद्यार्थ्यांना जाणीव होत आहे.

परसबागेतील उत्पादन शालेय पोषण आहाराशी जोडल्याने विद्यार्थ्यांना ‘पिकविणे आणि खाणे’ यातील संबंध समजत आहे. श्रमाचे महत्त्व, स्वावलंबन, पर्यावरण संवर्धन आणि सकस आहार यांसारख्या मूल्यांची रुजवण प्रत्यक्ष कृतीतून होत आहे.

शाळेच्या परसबागेचे नियोजन व व्यवस्थापन शिक्षक चांगदेव बबन पडवळ आणि मुख्याध्यापिका प्रमिला हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.वर्गखोलीतील शिक्षणाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड देणारी ही परसबाग विद्यार्थ्यांसाठी जणू ‘शेतीची खुली प्रयोगशाळा’ ठरत आहे.

1011108910

शेवाळवाडी-मंचर (ता.आंबेगाव) येथील पुणे मॉडेल स्कूल मधील विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय परसबागेतून घेतलेले डांगर भोपळ्याचे पीक.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 390586
1011080919

Related posts

भीमाशंकर सहकारी साखर कारखाना येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन !!

Chief Editor

ग्रामोद्योग भरारी पुरस्कारासाठी २८ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Chief Editor

समर्थ गुरुकुलचा (CBSE) दहावीचा १००% निकाल !!

Chief Editor

Leave a Comment