सामाजिक

समर्थ शैक्षणिक संकुलात गणेशोत्सव भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न ; विविध सांस्कृतिक उपक्रमांनी रंगला उत्सव !!

1011060558

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे यावर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात, भक्तिमय आणि आनंददायी वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जाणीव आणि कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने गणेशोत्सवाच्या कालावधीत विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
समर्थ शैक्षणिक संकुलातील मुलांच्या वसतिगृहात तसेच राजुरी येथील मुलींच्या वसतिगृहात श्री गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत विविध कार्यक्रमांचे नियोजन केले. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
गणेशोत्सवाच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण करत या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. विविध कार्यक्रमांचे नियोजन व आयोजन विद्यार्थ्यांनी स्वतः केल्यामुळे त्यांच्यातील नेतृत्वगुण, नियोजनकौशल्य आणि संघभावना विकसित होण्यास मदत झाली.
राजुरी येथील मुलींच्या वसतिगृहात आयोजित करण्यात आलेला ‘होम मिनिस्टर’ हा विशेष कार्यक्रम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. मयूर शिंदे यांच्या नियोजना खाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमातील विजेत्यांना हेडफोन, स्मार्टवॉच अशी बक्षिसे देण्यात आली.वसतिगृहातील सर्व मुलींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध खेळ व उपक्रमांचा मनमुराद आनंद लुटला. पारंपरिक संस्कृती आणि मनोरंजन यांचा सुंदर मिलाफ असलेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या गणेशोत्सवात समर्थ शैक्षणिक संकुलातील विविध महाविद्यालये व संस्थांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यामध्ये समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, समर्थ पॉलीटेक्निक, समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स, समर्थ ज्युनिअर कॉलेज, समर्थ गुरुकुल, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, समर्थ कॉलेज ऑफ नर्सिंग, समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालय, समर्थ हॉस्पिटल, समर्थ आयटीआय आणि समर्थ लॉ कॉलेज आदी संस्थांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते.
विविध उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळाले. तसेच विविध शाखा व महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांमध्ये परस्पर संवाद आणि आपलेपणाची भावना वाढीस लागली.
पारंपरिक वाद्यांचा गजरात, भक्तिमय व शांततापूर्ण वातावरणात करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या या विविध उपक्रमांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत तसेच सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापकवृंद यांनी विशेष कौतुक केले.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 378997

Related posts

जारकरवाडी गावच्या शिरपेचात मनाचा तुरा; जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे तीन विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र !!

Chief Editor

धामणी (लोणी) च्या वेदमूर्ती मंदार क्षिरसागर यांना ॠग्वेद पुरस्कार प्रदान !!

Chief Editor

जारकरवाडी (ता.आंबेगाव) येथील शेतकऱ्याचा मुलगा बनला कृषी अधिकारी !!

Chief Editor

Leave a Comment