सामाजिक

समर्थ संकुलात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी !!

img 20260414 wa0375

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ शैक्षणिक संकुल,बेल्हे येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.यानंतर उपस्थित मान्यवरांनी बाबासाहेबांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना अभिवादन केले.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने “भारतीय संविधान आणि बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर वल्लभ शेळके यांनी उपस्थितीतांना मार्गदर्शन केले . आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती प्रक्रिया,त्यातील मूलभूत अधिकार व कर्तव्ये,तसेच लोकशाही व्यवस्थेची वैशिष्ट्ये यांचा सखोल ऊहापोह केला.त्यांनी सांगितले की,बाबासाहेबांनी भारतीय समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळावा यासाठी आयुष्यभर संघर्ष केला आणि संविधानाच्या माध्यमातून देशाला एक मजबूत लोकशाही व्यवस्था दिली.

fb img 1774661444136

ते पुढे म्हणाले की,आजच्या तरुणांनी संविधानातील मूल्ये केवळ अभ्यासापुरती मर्यादित न ठेवता ती आपल्या दैनंदिन जीवनातही अंगीकारली पाहिजेत.समता,बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये प्रत्येकाच्या आचार-विचारांतून दिसली पाहिजेत,असे त्यांनी अधोरेखित केले.तसेच शिक्षणाचे महत्त्व,सामाजिक जबाबदारी आणि देशभक्तीची जाणीव याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

यानिमित्ताने समर्थ कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयांमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनकार्य या विषयावर वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजनही करण्यात आले होते.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.भूषण दिघे प्रा.दिनेश जाधव प्रा.सोमनाथ गाडेकर व राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी सुंदर अशा संविधान मंदिराची निर्मिती केली व सामूहिक संविधानाचे वाचन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर समर्थ कॉम्प्युटर सायन्स महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार,डॉ.लक्ष्मण घोलप,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके समर्थ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ.संतोष घुले,समर्थ पॉलीटेक्निकचे प्राचार्य डॉ.अनिल कपिले,प्रा.संजय कंधारे,आय टि आय चे उपप्रचार्य विष्णू मापारी,नर्सिंग महाविद्यालयच्या ऐश्वर्या गटकळ,विधी महाविद्यालयाचे प्रा.शिवाजी कुमकर,डॉ.शरद पारखे,क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे पदाधिकारी,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाबद्दल जागरूकता निर्माण झाली असून बाबासाहेबांच्या विचारांचे महत्त्व अधिक दृढ झाले.

Related posts

रविवार दि. 4 जानेवारी 2026 रोजी पुनित बालन ग्रुप, फ्री रनर्स ग्रुप पुणे आणि माजी विद्यार्थी विकास प्रबोधिनी लोणी यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार लोणी मॅरेथॉन २०२६ !!

Chief Editor

रानमळा (ता.आंबेगाव ) येथे धर्मनाथ महाराजांच्या (बीज) यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न!!

Chief Editor

जवळे (ता.आंबेगाव) ग्रामपंचायत झाली डिजिटल !!

Chief Editor

Leave a Comment