सामाजिक

पारगाव (शिंगवे) ग्रामपंचायतीकडून अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दप्तर व ड्रेस वाटप !!

1010565674
1010565674


पंचनामा प्रतिनिधी – पारगाव (शिंगवे) ग्रामपंचायतीच्या वतीने १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून गावातील सर्व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना दप्तर व ड्रेसचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळावा, त्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावावा आणि शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंगणवाडीतील लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व गणवेश उपलब्ध करून दिल्यामुळे पालकांवरील शैक्षणिक खर्चाचा काही प्रमाणात भार कमी होणार आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना आवश्यक साहित्य समान स्वरूपात उपलब्ध झाल्याने त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होणार आहे.
याबाबत ग्रामविकास अधिकारी के. डी. भोजने यांनी माहिती देताना सांगितले की, गावातील गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.
या वेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच नितीन ढोबळे, ग्रामपंचायत सदस्या रोहिणी देवडे, लता ढोबळे, प्रियंका ढोबळे, किरण ढोबळे, वीरेंद्र ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे, अंगणवाडी सेविका नंदा खामकर तसेच मदतनीस अश्विनी वारे उपस्थित होते.
ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.

1010543616
1010480394

Related posts

आता थांबायला हवं !!

Chief Editor

जीवन प्रवासात एकवेळ “पंगत” चुकली तर चालेल मात्र “संगत” चुकायला नको…!!

Chief Editor

देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील दोन अमृत रेल्वे स्थानकांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

Chief Editor

Leave a Comment