सामाजिक

पारगाव परिसरात नवीन गॅस कनेक्शन सुरू करण्याची मागणी !!

1011061013

पंचनामा प्रतिनिधी पारगाव – भीमाशंकर सहकारी साखर कारखाना परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना घरगुती गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने देशात कार्यरत असलेल्या कोणत्याही गॅस सिलेंडर कंपनीची नवीन गॅस कनेक्शनची प्रक्रिया तातडीने सुरू करावी, अशी मागणी पारगावचे माजी उपसरपंच विठ्ठल सिताराम ढोबळे यांनी आंबेगाव तालुका तहसीलदार राहुल सारंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पारगाव कारखाना परिसरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून ऊसतोड कामगार तसेच इतर मजूर रोजगारासाठी येत असतात. याशिवाय जिल्हा परिषद शिक्षक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक, भीमाशंकर कारखाना कामगार, हातावर पोट असणारी विविध समाजातील कुटुंबे तसेच स्थानिक नागरिक येथे वास्तव्यास आहेत. मात्र, घरगुती गॅस वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गॅस वितरण कंपनीने तत्काळ दखल घेत गॅस वितरणाचा प्रतीक्षा कालावधी ४५ दिवसांवरून २५ दिवसांवर कमी केला. त्यामुळे ग्रामीण भागातून गॅस वितरण कंपनीच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

1011061013

दरम्यान, सध्या नवीन गॅस कनेक्शन देण्याची प्रक्रिया बंद असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. गॅस वितरणावेळी ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी पाठविला जातो. मात्र, काही तांत्रिक अडचणी किंवा मोबाईल रिचार्ज नसल्यामुळे ओटीपी वेळेत प्राप्त होत नसल्याने गॅस सिलिंडरच्या वितरणात अडथळे निर्माण होत आहेत. या समस्येवर आवश्यक उपाययोजना करून नवीन गॅस कनेक्शनची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी ढोबळे यांनी केली.

यावेळी नायब तहसीलदार डॉ. सचिन वाघ, माजी उपसरपंच गणपतराव ढेरंगे, पुरवठा प्रमुख माधुरी संतोषवार, विलास बोराटे, सामाजिक कार्यकर्ते खंडू कोकणे, किरण थोरात, स्वप्नील लोखंडे आदी उपस्थित होते.

1010908108

Related posts

पारगाव (शिंगवे) येथील पुलावर अपघाताचा धोका;घोड नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूंना आवश्यक सूचना फलक बसवा – मा. उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांची मागणी!!

Chief Editor

शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी- कृषी विभागाचे आवाहन !!

Chief Editor

निरगुडसर येथे कृषीकन्यांचे उत्साहात स्वागत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी सात आठवडे शेतकऱ्यांसोबत राहून करणार मार्गदर्शन !!

Chief Editor

Leave a Comment