सामाजिक

शिरदाळे येथे शनिवारी संपन्न होणार दक्षिणमुखी हनुमान भंडारा सोहळा !!

img 20260820 wa0564
1010639438

पंचनामा प्रतिनिधी – शिरदाळे येथील ग्रामदैवत श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिरात श्रावण शनिवारनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी हा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हनुमंतरायाचा उत्सव मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
दुपारी ३ ते ५ वाजता धामणी गावचे भूषण प्रमोद काका देखणे यांच्या उपस्थितीत श्री हनुमान देवाचा अभिषेक करण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.३० वाजता सार्वजनिक महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
सायंकाळी ९ ते ११ वाजता श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळ, शिरदाळे यांच्या वतीने भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
या धार्मिक सोहळ्याचे आयोजन समस्त ग्रामस्थ, शिरदाळे आणि श्री हनुमान प्रासादिक भजनी मंडळ, शिरदाळे यांच्या वतीने करण्यात आले आहे. भाविकांनी उत्सवाला उपस्थित राहून श्री हनुमानाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

1010543616
1010480394

Related posts

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आंबेगाव तालुक्यात ‘जनसेवा सप्ताह’ उत्साहात साजरा होणार; विविध सामाजिक व आरोग्य उपक्रमांचे आयोजन

Chief Editor

निरगुडसर ते निरगुडसर फाटा रस्त्यावर खडीचा धोका; अपघाताची शक्यता वाढली !!

Chief Editor

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात विशेष वाहतूक व्यवस्था; दर्शनासाठी १० ठिकाणी वाहनतळाची सुविधा !!

Chief Editor

Leave a Comment