सामाजिक

जिल्हास्तरीय दिव्यांग शालेय क्रीडा स्पर्धेत पाबळ शाळेचे उल्लेखनीय यश !!

img 20260107 wa0616

पंचनामा लोणी-धामणी प्रतिनिधी – पुणे येथील बाबुराव सणस क्रीडांगणा सारसबाग इथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय दिव्यांग शालेय क्रीडा स्पर्धा सन २०२५–२६ मध्ये मतिमंद मुलांची निवासी शाळा, पाबळ, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या शाळेने उत्कृष्ट कामगिरी करत मतिमंद प्रवर्गात उपविजेतेपद पटकावले आहे.या स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्येही उल्लेखनीय यश संपादन केले. चिन्मय भोसले याने ५० मीटर धावणे व जागेवरून लांब उडी या दोन्ही स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक पटकावले. तसेच सुरेश घुले याने १०० मीटर धावणे या स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर पळत येऊन लांब उडी या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
एकूणच शाळेने या स्पर्धेत उपविजेता चषकासह ३ सुवर्णपदके व १ रौप्यपदक मिळवून जिल्हास्तरावर शाळेचा गौरव वाढविला आहे. या पुरस्कारांचे वितरण जिल्हा दिव्यांग सक्षमिकरण अधिधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या यशाबद्दल विजेत्या विद्यार्थ्यांचे, मार्गदर्शक शिक्षक डॉ.किरण बोडके, क्रीडा शिक्षक विजय संधानशिव सर, दत्तात्रय हराळ सर, परिचारिका मनीषा गायकवाड, प्रफुल गायकवाड व विद्यार्थ्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षकांचे व शाळा प्रशासनाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. भ वि जा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.शिवलाल जाधव संचालक समाजभूषण कैलासराव गायकवाड, मार्गदर्शक व्यवस्थापक गजानन जाधव, मुख्याध्यापक सिद्धेश्वर पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Related posts

भैरवनाथ सांस्कृतिक महोत्सव खडकवाडी येथे उत्साहात संपन्न !!

Chief Editor

औषधनिर्माण क्षेत्रातील संधी आणि फार्मासिस्ट ची भूमिका

Chief Editor

आयुष्याचा झोपाळा जितक्या वेगात मागे जातो तितक्याच वेगात तो पुढे पण येतो; फक्त संयम हवा..”

Chief Editor

Leave a Comment