सामाजिक

आदिवासी भागात सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्या ; भात पिके पावसाअभावी उन्हाने जळून गेली; शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती देण्याची मागणी

img 20261008 wa1030

1011231470

जांभोरी : आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी पश्चिम भागात यंदा पावसाने ओढ दिल्याने भात पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी भाताची पिके उन्हाने जळून सुकून गेली असून, आदिवासी शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने आदिवासी भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पश्चिम विभागाचे युवानेते मारुतीदादा केंगले यांनी केली आहे.

जांभोरी, पोखरी, चिखली, राजेवाडी, निगडाळे, कोंढवळ, आहुपे, तळेघर, पाटण, साकेरी, पिंपरी, महाळुंगे, कुशिरे खुर्द, कुशिरे बुद्रुक, नानवडे, कोंढरे, आडिवरे, तिरपाड, माळीण, आसाणे, बोरघर, फळोदे, फुलवडे, डिंबे, मापोली, गोहे खुर्द व गोहे बुद्रुक आदी आदिवासी भागातील भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

पावसाअभावी पिके सुकल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला असून, खरीप हंगामातील उत्पन्नाची आशा मावळली आहे. त्यामुळे कृषी विभाग व महसूल विभागाने प्रत्यक्ष शेतावर जाऊन नुकसानीची पाहणी करावी. तहसीलदार राहुल सारंग तसेच प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी प्रशासनाला तातडीने सूचना देऊन आदिवासी भागातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच आंबेगाव व जुन्नर तालुक्यांतील आदिवासी शेतकऱ्यांना दुष्काळी सवलती लागू करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अर्ज भरून घ्यावेत आणि शासनाच्या निकषानुसार तातडीने नुकसानभरपाई मंजूर करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

यावेळी युवा कार्यकर्ते गणेश केंगले, सुरेश केंगले, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश केंगले, माजी सैनिक मुरलीधर केंगले यांच्यासह परिसरातील आदिवासी शेतकरी बांधव उपस्थित होते.

“पावसाअभावी भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने कागदोपत्री पाहणी न करता प्रत्यक्ष शेतात जाऊन सरसकट पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी,” अशी मागणी मारुतीदादा केंगले यांनी केली.

Related posts

जारकरवाडी येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांना फराळ वाटप ; धार्मिक परंपरा, पांडवकालीन इतिहास आणि निसर्गसौंदर्याने नटलेले गाव !!

Chief Editor

जांभोरी गावठाणच्या विघ्नहर्त्याला उत्साहात निरोप !!

Chief Editor

मधमाशीची दृष्टी ठेवा,फुलांची काहीच कमी नाही – मधमाशींच्या पोळयांसाठी मित्रांनो कोणतीच रोजगार हमी नाही !!

Chief Editor

Leave a Comment