सामाजिक

शिंगवे भागडी येथील पशुपालकांना मका बियाण्याचे मोफत वाटप ; शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा..

1011604665
1011604677

प्रतिनिधी – समीर गोरडे

आंबेगाव तालुक्यातील पशुपालकांना हिरव्या चाऱ्याची उपलब्धता वाढविण्यासाठी मोफत मका बियाणे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती आंबेगाव यांच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२६-२७ च्या जिल्हा वार्षिक योजनेतर्गत हा चारा उत्पादन वैरण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

शिंगवे येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या कार्यक्षेत्रातील शिंगवे, भागडी गावांतील १०० पशुपालक शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच किलो याप्रमाणे एकूण ५०० किलो मका बियाण्याचे शंभर टक्के अनुदानावर वाटप करण्यात आले. दुष्काळजन्य परिस्थितीत चारा उत्पादनाला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. बियाण्यांची पेरणी तातडीने करून मुरघास निर्मितीसाठी चारा उत्पादन घ्यावे, असे आवाहन होते.

1011604673

पशुपालकांना करण्यात आले. भिमाशंकर सहकारी साखर कारखाना संचालक नितीन वाव्हळ, पोलीस पाटील गणेश पंडीत, मा.उपसरपंच हिरामण गोरडे,वामण टाके, रामदास वाव्हळ, शांताराम गोरडे यांच्या हस्ते बियाणे वाटप करण्यात आले. यावेळी पशुधन विकास अधिकारी डॉ. आर.जी.गहिरे, डॉ .ऋषीकेश वाळुंज तसेच परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

सध्या जनावरांसाठी हिरव्या चाऱ्याची उपलब्धता हा पशुपालकांसमोरील महत्त्वाचा प्रश्न बनला आहे. अशा परिस्थितीत अनुदानावर मका बियाणे उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात चारा उत्पादन घेता येणार आहे. त्यामुळे पशुधनासाठी हिरवा चारा आणि मुरघास उपलब्ध होण्यास मदत होणार असून, पशुपालकांना दिलासा मिळणार आहे.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 402642
1011523562

Related posts

जारकरवाडी प्राथमिक शाळेचा शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यात डंका !!

Chief Editor

आळंदीत मुक्तादेवी धर्मशाळेत मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना झाली संपन्न !!

Chief Editor

कोलंबो येथे ‘इंडियन पोलीस मित्र भारत इंटरनॅशनल अवॉर्ड – श्रीलंका २०२६’ उत्साहात !!

Chief Editor

Leave a Comment