सामाजिक

कोलंबो येथे ‘इंडियन पोलीस मित्र भारत इंटरनॅशनल अवॉर्ड – श्रीलंका २०२६’ उत्साहात !!

img 20260214 wa0635

पंचनामा प्रतिनिधी – भारत–श्रीलंका मैत्रीचे प्रतीक ठरले भव्य आंतरराष्ट्रीय सन्मान सोहळा कोलंबो (श्रीलंका) – डी. एस. राठोड फाउंडेशन, शांतीदूत परिवार, सर्किट बेंच फाउंडेशन व मार्शल योगा अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘इंडियन पोलीस मित्र भारत इंटरनॅशनल अवॉर्ड – श्रीलंका २०२६’ हा भव्य आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र, हाय कमिशन ऑफ इंडिया कोलंबो. येथे अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला.

सामाजिक, शैक्षणिक, योग, मार्शल आर्ट, पोलीस मित्र सेवा, क्रीडा तसेच राष्ट्रीय हितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविण्याच्या उद्देशाने हा मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भारतीय उच्चायोगाच्या सांस्कृतिक केंद्रात हा सोहळा पार पडणे ही भारत–श्रीलंका मैत्रीपूर्ण संबंधांची दृढता दर्शवणारी बाब मानली जात असून भारतीय सेवाभावी संस्थांच्या कार्याला मिळालेला जागतिक सन्मान म्हणून याकडे पाहिले जात आहे.

img 20260213 wa0495

या सोहळ्यात भारत व श्रीलंका येथील एकूण २५ मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. भारतामधून सन्मानित मान्यवर:
सरोज फडके (कोल्हापूर), मेजर विलास माने (सांगली), दिलीप सनगर (कोल्हापूर), सुमन देसाई (ठाणे), वैद्य डॉ. गुंडोपंत सुतार (सांगली), डॉ. बिंदिया पाटील (मुंबई), डॉ. सुरेश राजोबा (कोल्हापूर), भाग्यश्री वर्तक (मुंबई), डॉ. अरुणा घोलप (अहिल्यानगर), डॉ. अंजली चिंचोलीकर (छत्रपती संभाजीनगर), बाबासो कांबळे (कोल्हापूर), दशरथ तूपसुंदर (अकोला), मॅडी तामगावकर (कोल्हापूर), डॉ. संजय गिरी बुवा (सातारा)

श्रीलंकेतून सन्मानित मान्यवर:
डॉ. एन. के. एस. थिरुचेलवेम, डॉ. सुभाषनी पद्मनाथन, डॉ. इंद्राणी पेरेरा, डॉ. विकनावरनी सेलवनाथन, ८५ वर्षीय योगगुरू रत्नपीलइ कलियुगव, शिव राम कृष्णन, व्यास कल्याणसुंदरम आदी मान्यवरांचा त्यांच्या सामाजिक व सांस्कृतिक योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

मान्यवरांची उपस्थिती –
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी पूर्णानंद गिरीजी (मठाधिपती), उदय देशपांडे (पद्मश्री, भारत) तसेच यमुना जी गणेशलिगमन (श्रीलंका भारत सोसायटीच्या तात्काळ माजी अध्यक्षा व कोलंबो युवती हिंदू संघटनेच्या संरक्षक) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या संपूर्ण आंतरराष्ट्रीय सोहळ्याचे आयोजन व मार्गदर्शन डॉ. सुरेश राठोड (इंडियन पोलीस मित्र भारतचे मुख्य अधिकारी) आणि आंतरराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्त्या मीनल रेणवीकर यांच्या पुढाकाराने यशस्वीरीत्या पार पडले.

कार्यक्रमाचे प्रभावी व अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन डॉ. अंजली चिंचोलीकर यांनी केले.

याशिवाय डॉ. व्यास कल्याणसुंदरम, डॉ.वैभव पाटील, गजानन देसाई तसेच भारत–श्रीलंका येथील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
हा पुरस्कार सोहळा पुरस्कारप्राप्त व्यक्तींना अधिक जोमाने समाजहितासाठी कार्य करण्याची नवी प्रेरणा देणारा ठरला, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. भारत–श्रीलंका मैत्री अधिक दृढ करणारा आणि भारतीय कार्यकर्त्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणारा हा सोहळा संस्मरणीय ठरला.

Related posts

राज्यातील पहिल्या मॉडेल मुद्रांक व नोंदणी कार्यालयाचे पुण्यात उद्घाटन ; ‘वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन’मुळे जिल्ह्यात कुठेही दस्त नोंदणी; नागरिकांना अत्याधुनिक सुविधा– महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Chief Editor

पारगाव (शिंगवे) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखानास्थळी संपन्न झाला वन-अग्नीमुक्त दिन!!

Chief Editor

अशी कला, असे कलावंत – तमाशा कलेतील नृत्यबिजली रेखा अण्णा साठे (अकलूजकर)

Chief Editor

Leave a Comment