
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट,बेल्हे या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विशेष ड्रोन वर्कशॉप व ड्रोन कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आले.या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ड्रोन ट्रेनर यश गुंजाळ यांनी विद्यार्थ्यांना ड्रोन तयार करण्यापासून ते ड्रोन यशस्वीपने उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचे सखोल प्रात्यक्षिक दाखविले.कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना ड्रोन तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती देण्यात आली.
ड्रोनची रचना,त्याचे कार्य,वापराची विविध क्षेत्रे,आधुनिक तांत्रिक बाबी तसेच भविष्यातील संधी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

आजच्या आधुनिक युगात शेती,संरक्षण,आपत्ती व्यवस्थापन,सर्वेक्षण,चित्रिकरण,वैद्यकीय सेवा अशा अनेक क्षेत्रांमध्ये ड्रोनचा प्रभावी वापर होत असल्याने विद्यार्थ्यांनी या तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळवणे अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत ड्रोनचे बेसिक कंपोनंट्स,उड्डाण नियंत्रण प्रणाली,सेन्सर्सचा वापर,सुरक्षित उड्डाण पद्धती याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण घेतले.तसेच ड्रोन तयार करणे,त्याचे प्रोग्रामिंग करणे आणि तांत्रिक अडचणी सोडविणे याबाबतही मार्गदर्शन मिळाले.
कार्यशाळेनंतर आयोजित ड्रोन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.विविध प्रकारचे ड्रोन उडवून विद्यार्थ्यांनी आपले तांत्रिक कौशल्य सादर केले.या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना,समस्या सोडविण्याची क्षमता,नेतृत्वगुण आणि टीमवर्कची भावना वृद्धिंगत झाली.
वेद कढणे,सार्थक देशमुख,साहिल खरगे,आदित्य चौधरी,सिद्धेश भुजबळ,पायल निकम,नूतन कोटकर यांनी ड्रोन टेक्नॉलॉजी या कार्यशाळेमध्ये विद्यार्थी समन्वयक म्हणून मोलाची कामगिरी बजावली.

या उपक्रमाचे समन्वयक विभागप्रमुख प्रा.निर्मल कोठारी,प्रा.प्रियंका लोखंडे,प्रा.प्रियंका पोटफाडे, प्रा.सुचिता साबळे व प्रा.दिपाली गाडगे यांनी मार्गदर्शन केले.
या उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,डॉ.शरद पारखे तसेच संकुलातील सर्व विभागांचे प्राचार्य,विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

