सामाजिक

राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त पंचायत समिती आंबेगाव तर्फे अंगणवाडी सेविकांचा सत्कार !!

img 20260425 wa0498
img 20260425 wa0498

पंचनामा प्रतिनिधी – पंचायत समिती आंबेगाव तर्फे राष्ट्रीय पंचायत राज दिन साजरा करण्यात आला या दिवसाचे अवचित्य साधत तालुक्यातील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या तालुक्यातील विविध विभागातील गाव पातळीवर उल्लेखनीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पंचायत समिती मार्फत पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यामध्ये धामणी गावठाण अंगणवाडीतील अंगणवाडी सेविका सौ.महेश्वरी आळेकर तसेच मदतनीस सौ.प्रीतम रोडे यांना महिला बालकल्याण विभागामार्फत प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती सभापती कैलास बुवा काळे होते. या कार्यक्रमासाठी पंचायत समिती सभापती कैलास बुवा काळे तसेच उपसभापती ज्योती पारधी पंचायत समिती सदस्य प्रियंका वाघ निलेश टेमकर संजय पवळे गटविकास अधिकारी सौ प्रमिला वाळुंज सहाय्यक गटविकास अधिकारी वैशाली इदे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री कुलदीप जाधव पर्यवेक्षिका सौ अनिता लांडे , अनिता हिरवे पंचायत विस्तार अधिकारी श्री रंगनाथ हुजरे व तालुक्यातील अधिकारी वर्ग उपस्थित होता.

img 20260425 wa0498

कार्यक्रमाच्या शेवटी विस्तार अधिकारी श्री रंगनाथ हुजरे यांनी आभार मानले.

fb img 1774661449199

Related posts

जारकरवाडी येथील लबडेवस्ती विद्युत डीपी जवळ रस्त्यावर पडलेत मोठे खड्डे !!

Chief Editor

धक्कादायक बातमी – वडगावपीर येथे अंत्यविधी साठी आलेल्या ग्रामस्थ, पाहूणे यांच्यावर आग्या मधमाशांचा हल्ला !!

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी येथे सह्याद्री अ‍ॅग्रोव्हेट व हिंगे पाटील कृषी उद्योग यांच्या माध्यमातून स्कूल बॅग वाटप !!

Chief Editor

Leave a Comment