सामाजिक

पारगाव (शिंगवे) येथे वयोवृद्धांना एस.टी.प्रवासात सवलत देणारे स्मार्ट कार्ड काढण्याचा कॅम्प संपन्न!!

1009607663

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील पारगाव (शिंगवे) या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघ व पारगाव ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने मुक्ता देवी मंदिरात एस.टी.प्रवासात सवलतीसाठी एन.सी.एम.सी स्मार्ट कार्ड पुरुषांसाठी ६५ ते ७५ तसेच स्त्रिया १३ ते ७५ आणि तसेच ७५ च्या पुढील पुरुष व महिला यांच्या साठी मोफत स्मार्ट कार्ड काढून देण्याचे काम आज दिवसभरात मंदिरात सुरू होते.या शिबिरात सदर १२० पुरुष व महिला उपस्थित होते.

या उपक्रमामध्ये वयोवृद्धांनी व महिलांनी सहभाग घेऊन स्मार्ट कार्ड काढून घेतले.यावेळी लीडर सर्विसेस मंचर यांच्या सहभागाने व ज्येष्ठ नागरिक संघाच्या मदतीने उपक्रम राबविण्यात आला होता.

1009607663

यावेळी शरद सहकारी बँकचे संचालक दौलतराव लोखंडे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किसन ढोबळे,उपाध्यक्ष दिगंबर आस्वारे, मा.उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल ढोबळे, सामाजिक कार्यकर्ते बजरंग देवडे, मुक्ता देवी पायी दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष भागचंद पोंदे,इरशान सय्यद,अखलाक मिरझा, माणिकचंद शेटीया,निखिल दातखिळे,शिवराम ढोबळे,पोपट दातखिळे,राजु ढोबळे, दादाभाऊ ढोबळे,रामदास पोंदे,आदी मान्यवर उपस्थित होते अशी माहिती संघाचे सचिव मदन सांगोलकर यांनी दिली.

fb img 1774661449199

Related posts

कान्हूर मेसाई येथे जिल्हास्तरीय शालेय भजन व गौळण स्पर्धेचा भक्तिरसात रंगलेला सोहळा संपन्न!!

Chief Editor

भाजीपाला बाजारभाव कोसळले; शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही मिळेना !!

Chief Editor

रणरणत्या उन्हात तिघांची सायकलवारी; माऊलींच्या पालखी मार्गाने प्रवास !!

Chief Editor

Leave a Comment