सामाजिक

लोणी ते जारकरवाडी मार्गे मंचर रस्त्यावर सर्वत्र खड्डेच खड्डे !!

1010489861

पंचनामा प्रतिनिधी – लोणी ( ता. आंबेगाव) ते जारकरवाडी मार्गे मंचर या रस्त्यावर धामणी येथील द्रोणागिरी-जाधवमळा,जारकरवाडी येथील भोजणधरा व लोले वस्ती आणि धामणी फाटा नजदिक रस्त्यावर लहान मोठे खड्डे मोठ्या प्रमाणात पडल्याने लहान मोठ्या वाहन चालकांना गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.त्यामुळे आता या रस्त्यावरील खड्डे बुजविणे महत्वाचे नसून आता या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी स्थानिक नागरीक व वाहान चालकांनी केली आहे.

लोणी परिसरातील नागरीकांना व शिरूर तालुक्यातील पाबळ,केंदूर,कान्हूरमेसाई परिसरतील नागरीकांना लोणी वरून जारकरवाडी मार्गे मंचरला जाण्यासाठी हा एकमेव जवळचा महत्वाचा रस्ता असल्याने या रस्त्यावरून लहान मोठ्या वाहानांची मोठी वर्दळ असते.पण वरील ठिकाणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात लहान मोठे खड्डे पडल्याने वाहान चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे त्वरीत बुजवावेत अशी मागणी धामणीचे मा.सरपंच सागर जाधव पाटील, मा.सरपंच रेश्मा बोर्हाडे, उपसरपंच अक्षयराजे विधाटे, अशोक जाधव पाटील स्थानिक ग्रामस्थ व वाहन चालकांनी केली आहे.

1010489686
1010480394

Related posts

मानाच्या १० पालख्यांसोबतच्या दिंड्यांना प्रति दिंडी २० हजार प्रमाणे २ कोटी ८० लाखांचे अनुदान मंजूर; मुख्यमंत्री वारकरी महामंडळामार्फत वाटप सुरू !!

Chief Editor

आपली “सावली” बनून तो प्रत्येक वेदना सहन करत असतो, “बाप” तर फक्त आपल्या मुलांसाठी जगत असतो..!!”

Chief Editor

विजेच्या लपंडावाने मांदळेवाडीकर झालेत त्रस्त !!

Chief Editor

Leave a Comment