सामाजिक

जुन्नर तालुक्यातील कांदळी ग्रामपंचायत हद्दीत कला केंद्रात बारी लावण्यावरून वाद,तरुणाकडून गोळीबार, पोलीस घटनास्थळी, गुन्हा दाखल !!

1010494833
1010494833

पंचनामा प्रतिनिधी – जुन्नर तालुक्यातील चौदा नंबरजवळील कांदळी ग्रामपंचायत हद्दीतील पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या तुळजाभवानी कला केंद्रावर चाकण येथील तरुणाने गोळीबार केल्याने ओतुर येथील फिरोज कादिर शेख (वय 31) हा तरुण जखमी झाला असून जखमीला आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सदर घटना आज (दि.८) रोजी पहाटे ४.०० वाजण्याच्या सुमारास घडली.

सदर घटनेवरून नारायणगाव पोलीस स्टेशन येथे कला केंद्र व्यावसायिक अक्षय अनिल धोंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गु.र.नं. 191/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 (1), 127 (1), 115, 352,351(2) (3), 3 (5) व शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3, 25, 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सपोनि प्रवीण संपांगे यांनी दिली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज (दि.८ ऑगस्ट) रोजी पहाटे ४:३० ते ४:५० वा. चे दरम्यान पुणे नाशिक हायवे लगत मौजे कांदळी ता. जुन्नर जि. पुणे गावचे हद्दीत कोळेकर, आण्णा व चिनु व त्याचे सोबत असणाऱ्या एक अनोळखी इसमानी तुळजाभवानी संस्कृती कलाकेंद्र, कांदळी, ता. जुन्नर, जि. पुणे येथे कार्यक्रमाची बारी लावण्याचे कारणावरून बारी मालकीण व आमच्याशी वाद घालुन, तिसरी बारी न लावल्याने बारी मालकीण मनिषा, मला व आमचे कामगारांना शिवीगाळ दमदाटी करून, धक्काबुद्धी करून, हाताने मारहाण केले व आम्हाला जिवे मारण्याचे उद्देशाने त्या चार इसमांपैकी एकाने त्याचे जवळील पिस्टल काढून माझेवर रोखत, मारू का? मारू का? असे म्हणत माझेवर पिस्टल मधुन फायर करून मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मी बाजुला सरकलो म्हणून मला गोळी लागली नाही परंतु त्यावेळी तेथे जमलेल्या इसमांपैकी फिरोज कादीर शेख, वय ३१ वर्षे रा. ओतुर, भोईगल्ली, ता. जुन्नर , जि. पुणे यास लागुन तो जखमी झाला आहे म्हणून माझी (१) कोळेकर (२) आण्णा (३) चिनु व त्याचे सोबत असणा-या (४) एक अनोळखी इसम असे चौघांविरूध्द फिर्याद आहे. वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील नारायणगाव पोलीस स्टेशन हे करत आहेत.

याबाबतची माहिती पोलिसांना समजल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. जखमी तरुणाला आळेफाटा येथे खाजगी रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.

गोळीबार करणाऱ्या चाकण येथील तरुणांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक चाकण येथे पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवून कला केंद्र रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी तांबे यांनी सदर कला केंद्र बंद करावे अशी मागणी केली आहे.

Related posts

शेवभाजी… !!!

Chief Editor

पंचनामा विशेष – नाते कलेचे त्या रक्ताशी !!

Chief Editor

लोणी (धामणी) येथे महाशिवरात्री निमित्ताने संपन्न होणार अखंड हरिनाम सप्ताह!!

Chief Editor

Leave a Comment