सामाजिक

समर्थ अभियांत्रिकीच्या २०२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड ; उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर रोजगाराच्या संधी; मेकॅनिकल विभागाची शंभर टक्के प्लेसमेंट !!

1010350077
1010350077


पंचनामा प्रतिनिधी – गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख प्रशिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेतलेल्या समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे यांनी यंदाच्या प्लेसमेंट हंगामात पुन्हा एकदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाविद्यालयातील २०२ विद्यार्थ्यांची देशातील विविध नामांकित बहुराष्ट्रीय व अग्रगण्य कंपन्यांमध्ये निवड झाली असून, उर्वरित विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण, इंटर्नशिप आणि स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारत करिअरच्या नव्या वाटा निवडल्या आहेत.
यंदाच्या प्लेसमेंटमधील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व ४१ विद्यार्थ्यांची शंभर टक्के प्लेसमेंट. क्वालिटेक लॅब्स, लीन फॅब लेझर इंजिनिअरिंग, कल्याणी टेक्नो फोर्स, झेडएफ स्टिअरिंग इंडिया, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, याझाकी इंडिया, टाटा टेक्नॉलॉजी, एल अँड टी डिफेन्स, पेंटा फोर्ज आणि श्री इंजिनिअरिंग यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांनी समर्थच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
कॉम्प्युटर इंजिनिअरिंग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग विभागातील ४८ विद्यार्थ्यांनी इन्फोसिस, टीसीएस, ॲक्सेन्चर, एलटीआय माइंडट्री, बजाज फिनसर्व्ह यांसह अनेक आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये निवड मिळवली. याशिवाय १० विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचा मार्ग स्वीकारला, तर १२ विद्यार्थी नामांकित उद्योगसंस्थांमध्ये इंटर्नशिपद्वारे व्यावसायिक अनुभव घेत आहेत.
इलेक्ट्रिकल विभागातील ३७, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील २२, सिव्हिल विभागातील २६ आणि एमसीए विभागातील २८ विद्यार्थ्यांनीही विविध राष्ट्रीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड मिळवत महाविद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. विशेष म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स विभागातील तीन विद्यार्थ्यांनी स्वतःचा उद्योग सुरू करून रोजगारनिर्मितीचा आदर्श घालून दिला आहे.
महाविद्यालयाचा ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग विद्यार्थ्यांना उद्योगसज्ज करण्यासाठी जपानी व जर्मन भाषा प्रशिक्षण, रोबोटिक्स, ड्रोन टेक्नॉलॉजी, हॅकॅथॉन, प्रोजेक्ट स्पर्धा, उद्योगतज्ज्ञांची व्याख्याने, सॉफ्ट स्किल्स, इंग्रजी संभाषण कौशल्य आणि ॲप्टिट्यूड प्रशिक्षण यांसारखे उपक्रम सातत्याने राबवत आहे. या उपक्रमांमुळेच विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील उद्योगविश्वात भक्कम स्थान मिळत असल्याचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. सचिन पोखरकर यांनी सांगितले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा. राजीव सावंत, प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
══════════════════════
📦 ठळक वैशिष्ट्ये
══════════════════════
▶️ २०२ विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड
▶️ मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाची १००% प्लेसमेंट
▶️ १० विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाची निवड
▶️ १२ विद्यार्थी उद्योगांमध्ये इंटर्नशिप करत आहेत
▶️ ३ विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराचा मार्ग स्वीकारला
▶️ उद्योगाभिमुख प्रशिक्षणामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर करिअरच्या संधी

Related posts

वाहनचालक अनुज्ञप्तीसाठी (लायसन ) स्थानिक वास्तव्य प्रमाणपत्राऐवजी वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !!

Chief Editor

लोकसहभागातून फुलवली वनराई; आंबेगाव तालुक्यातील लोणी ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम !!

Chief Editor

धामणी (ता.आंबेगाव) येथील श्री म्हाळसाकांत खंडोबा यात्रेत दर्शनासाठी भाविकांची गर्दी !!

Chief Editor

Leave a Comment