सामाजिक

धक्कादायक बातमी – वडगावपीर येथे अंत्यविधी साठी आलेल्या ग्रामस्थ, पाहूणे यांच्यावर आग्या मधमाशांचा हल्ला !!

1010427537
1010427537

पंचनामा प्रतिनिधी – वडगावपीर ( ता.आंबेगाव ) येथे प्रेत ठेवून ग्रामस्थांना पळ काढावा लागला. वडगावपीर येथील पोखरकर मळा क्रमांक एक दोन येथील स्मशानभूमीत जवंताबाई निवृत्ती पोखरकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांवर अचानक आग्या मधमाशांच्या मोहोळाने हल्ला चढवल्याने एकच गोंधळ उडाला.या अनपेक्षित घटनेमुळे उपस्थित ग्रामस्थांना, पाहूण्यांना काही काळासाठी मृतदेह जागेवरच ठेवून जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला.

अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असतानाच स्मशानभूमी परिसरातील आग्या मधमाशांचे मोहोळ अचानक उठले आणि उपस्थितांवर तुटून पडले.आग्या मधमाशांच्या हल्ल्यामुळे स्मशानभूमीत भीतीचे वातावरण निर्माण झाले.जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी, पाहूण्यांनी सैरावैरा धाव घेतली.
या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही.मात्र आग्या मधमाशांच्या हल्यामध्ये अंकूश पोखरकर,खंडू पोखरकर,ज्ञानेश्वर पोखरकर,विजय पोखरकर,बाबूराव पोखरकर,महादू पोखरकर,नवनाथ वाळूंज इतर ग्रामस्थ पाहूणे जखमी झाले असून त्यांना तातडीने माजी सरपंच संजय पोखरकर,माजी उपसरपंच अण्णा पोखरकर यांनी धावपळ करून जखमीणा लोणी येथे खाजगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

Related posts

निरगुडसर (ता.आंबेगाव) येथील पंडीत जवाहरलाल नेहरू माध्यमिक व दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील उच्च माध्यमिक विद्यालयात रस्ता सुरक्षा व सायबर सुरक्षा विषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न !!

Chief Editor

जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक सौदागर घुमट !!

Chief Editor

मालमत्ता विरोधी पथकाची पुणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी ;कांदळी येथील कला केंद्रावर गोळीबार करणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या !!

Chief Editor

Leave a Comment