सामाजिक

जवळे येथे वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप !!

1010420425

पंचनामा प्रतिनिधी – जवळे (ता. आंबेगाव) येथील उद्योजक तुषार शेठ खालकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त तसेच वडील स्व. राजाराम किसनराव खालकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जवळे येथे विद्यार्थ्यांना शालेय दप्तरांचे वाटप केले. या उपक्रमाअंतर्गत शाळेतील २० विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीतील १७ बालकांना शालेय दप्तरांचे वितरण करण्यात आले. या सामाजिक उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ह.भ.प. वैभव महाराज शिंदे व मुख्याध्यापक चेतन बेढारी यांच्या हस्ते तुषार शेठ खालकर यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सामाजिक कार्याबद्दल गौरव केला.

1010420425

कार्यक्रमास भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक बाबासाहेब खालकर, माजी चेअरमन अंकुशर गायकवाड, माजी सरपंच हरिचंद्र शिंदे, माजी उपसरपंच दत्तात्रय लायगुडे, माजी उपसरपंच पोपटशेठ शिंदे, बबन बोराटे, शंकर वाळुंज, संजय गावडे, किसन लोखंडे, अंगणवाडी सेविका शालन सोनवणे, वर्गशिक्षिका वनिता बारभाई, शशिकला गावडे, नयन खालकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

याच प्रसंगी शाळेत लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची माहिती जिल्हा परिषद शाळेचे माजी अध्यक्ष उत्तम शिंदे पाटील यांनी दिली.

1010391286

Related posts

पालखी सोहळ्यातील वाहनांची तांत्रिक तपासणी करुन घेण्याचे आवाहन !!

Chief Editor

उन्हाळ्याची चाहूल लागताच माठांची मागणी वाढली; ‘गरीबांचा फ्रीज’ पुन्हा घराघरांत पोहचणार !!

Chief Editor

पारगाव (शिंगवे ) गावात जपली जातेय वीर देवाची शेकडो वर्षांची परंपरा !!

Chief Editor

Leave a Comment