सामाजिक

शालेय बस सुरक्षेसाठी सुधारित नियम लागू; तीन महिन्यांत अंमलबजावणी बंधनकारक !!

1010350786

पंचनामा प्रतिनिधी – महाराष्ट्र शासन राजपत्रात १६ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन) (प्रथम सुधारणा) नियम, २०२६ लागू करण्यात आले आहेत. सुधारित नियमानुसार मुंबई महानगर क्षेत्र वगळता राज्यातील इतर भागात शालेय बस व शालेय व्हॅनच्या परवान्यासाठी वाहनाची नोंदणी दिनांकापासूनची वयोमर्यादा (आयुष्यमान) १५ वर्षांवरून २० वर्षांपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शालेय बसच्या शुल्काचे (दर) निर्धारण करण्याचे अधिकार संबंधित प्रादेशिक परिवहन प्राधिकरण यांना प्रदान करण्यात आले आहेत.

तसेच सर्व शालेय बस व विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाईस विथ पॅनिक बटण, फायर डिटेक्शन अँड अलार्म सिस्टिम , सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टिम, वाहनाचे थेट लोकेशन दर्शविणारी मोबाईल अॅप सुविधा, विद्यार्थ्यांच्या डिजिटल उपस्थितीची नोंद, पालकांना सूचना देणारी प्रणाली तसेच किमान ३० दिवसांचे सीसीटीव्ही रेकॉर्ड जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय वाहनातील सर्व आसनांना सीटबेल्ट असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

1009850407

Related posts

समर्थच्या इशिता काकडेची राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी निवड ; विभागीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत इशिताने मिळविले यश ; नागपूर येथे राज्यस्तरावर कौशल्य दाखविण्याची संधी !!

Chief Editor

वन्यजीव सप्ताहाचा लोणी विद्यालयात उत्साहात समारोप ;ध्वनीचित्रफितीद्वारे विद्यार्थ्यांना वन्यजीव संवर्धनाचे महत्त्व; रेस्क्यू टीमकडून विशेष मार्गदर्शन

Chief Editor

भीमाशंकर कारखान्यावर ध्वजवंदन उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment