सामाजिक

भीमाशंकर कारखान्यावर ध्वजवंदन उत्साहात संपन्न !!

1010589836

पंचनामा प्रतिनिधी – दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यात ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना देवून ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली.

भीमाशंकर शिक्षण संस्थेच्या दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील महाविद्यालयात कारखान्याचे व शिक्षण संस्थेचे चेअरमन बाळासाहेब बेंडे व दोन विद्यार्थ्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

1010589836

यावेळी कारखान्याचे संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे, आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, ज्ञानेश्वर अस्वारे, रामहरी पोंदे, नितीन वाव्हळ, पोपटराव थिटे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, जनरल मॅनेजर शिरीष सुर्वे, सचिव रामनाथ हिंगे, चिफ अकौंटंट राजेश वाकचौरे, मुख्य शेतकी अधिकारी दिलीप कुरकुटे, कामगार कल्याण अधिकारी सुरेश शिंदे, पर्चेस ऑफिसर ब्रिजेश लोहोट, स्टोअर किपर अनिल बोंबले, संगणक विभाग प्रमुख प्रमोद पाटील, सुरक्षा अधिकारी कैलास गाढवे, शिक्षण संस्थेचे ओ.एस.डी. बी.डी. चव्हाण, कार्यालयीन सचिव वसंत जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य नाथा मोकाटे, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी इंग्रजी माध्यमाच्या, जिल्हा परिषद साखर शाळेच्या व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. महाविद्यालयाचे प्राचार्य निरजकुमार शर्मा यांनी आभार मानले.

1010589825

दत्तात्रयनगर, पारगाव येथे भीमाशंकर साखर कारखान्यावर चेअरमन बाळासाहेब बेंडे व मा. संचालक मंडळाने ध्वजाला मानवंदना दिली.

1010457105

Related posts

काळाच्या ओघात लुप्त होत चाललाय वासुदेव; लोकपरंपरेचा आवाज हरवण्याची भीती !

Chief Editor

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारती भोवतालचा मलबा हटवून इमारतीत सुरक्षित प्रवेश मार्ग तयार करण्याच्या कामाला सुरुवात

Chief Editor

वडगावपीर (ता.आंबेगाव ) येथील श्री पिरसाहेब देवाच्या पाठीमागे असलेल्या जुन्या चिंचेच्या झाडावर वीज कोसळली !!

Chief Editor

Leave a Comment