सामाजिक

समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालयात धन्वंतरी पूजन उत्साहात संपन्न ; भक्तिमय वातावरणात आयुर्वेदाचा प्रचार व रुग्णसेवेचा संकल्प !!

1011609096
1011609096

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ आयुर्वेदिक महाविद्यालय, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, बेल्हे येथे धनत्रयोदशीचे औचित्य साधून भगवान धन्वंतरी जयंती उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. आयुर्वेदाचे आराध्य दैवत आणि आरोग्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या भगवान धन्वंतरी यांच्या पूजनाचे आयोजन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.

संस्थेचेअध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर यांच्या हस्ते भगवान धन्वंतरी यांच्या विधिवत पूजनाने, अभिषेकाने आणि धन्वंतरी स्तवनाने विधिवत पूजा पार पडली.यावेळी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय लोंढे, डॉ. रमेश पाडेकर, तसेच  प्राध्यापक, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी प्राचार्य डॉ. संजय लोंढे यांनी धनत्रयोदशी आणि धन्वंतरी जयंतीचे धार्मिक व वैद्यकीय महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, समुद्रमंथनातून अमृतकलश घेऊन प्रकट झालेले भगवान धन्वंतरी हे आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहेत. आजच्या धावपळीच्या जीवनात निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदाचा अंगीकार करणे आणि या प्राचीन उपचारपद्धतीचा प्रसार घराघरांत पोहोचवणे, हीच भगवान धन्वंतरी यांची खरी सेवा आहे.

या निमित्ताने भगवान धन्वंतरी यांची महापूजा व आरती करण्यात आली. सर्वांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना करण्यात आली. धनत्रयोदशीच्या परंपरेनुसार विविध औषधी वनस्पती व आयुर्वेदिक औषधांचे पूजन करण्यात आले. तसेच नव्याने प्रवेश घेतलेल्या बी.ए.एम.एस. विद्यार्थ्यांना आयुर्वेद क्षेत्राचा प्रचार-प्रसार करण्यासह रुग्णसेवा प्रामाणिकपणे व निष्ठेने करण्याची प्रतिज्ञा देण्यात आली.

पूजेनंतर उपस्थित रुग्ण, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
1011523562

Related posts

ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे येथे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांची जयंती उत्साहात साजरी !!

Chief Editor

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे राबविला गेला अनोखा अन अभिमानास्पद सोहळा !!

Chief Editor

हरवले आहेत – श्री.एकनाथ देवराम सुक्रे (आचारी) वय ६० वर्ष राहणार खडकवाडी, लोणी ता.आंबेगाव,जिल्हा पुणे

Chief Editor

Leave a Comment