सामाजिक

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे राबविला गेला अनोखा अन अभिमानास्पद सोहळा !!

1010374637

खिल्लार देशी गोवंश संवर्धनाचा अभिमान.. लाडक्या “भारत”चा पहिला वाढदिवस !!

पंचनामा विशेष – घरच्या गाईपासून जन्मलेला खिल्लार देशी गोवंशाचा लाडका “भारत” याचा पहिला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे .

पूर्वीच्या काळात रणपिसे परिवाराकडे असलेला “भारत” हा शिरदाळे गावातील सर्वात वेगवान आणि मानाचा पळणारा बैल म्हणून ओळखला जायचा. त्या अभिमानास्पद आठवणी जपण्यासाठी आणि देशी गोवंश संवर्धनाचा वारसा पुढे नेण्यासाठी, त्याच नावाने नव्या “भारत”चे संगोपन करण्यात आले आहे.

आज त्या नव्या “भारत”चा पहिला वाढदिवस हा संपूर्ण गावासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

कार्यक्रमामध्ये बैलाची भव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती, हनुमान मंदिराच्या प्रांगणात शिरदाळे ग्रामस्थ आणि रणपिसे परिवराच्या नातेवाईक पै. पाहुणे मित्रपरिवाराच्या उपस्थितीमध्ये बैलाचे औक्षण करून केक कापण्यात आला,
यानंतर संपूर्ण गावासाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.

देशी खिल्लार गोवंशाचे संवर्धन, आपल्या परंपरेचा सन्मान आणि गावाची एकजूट याचे हे सुंदर उदाहरण आहे.

1009850407

Related posts

श्री शिखर शिंगणापूर कावड यात्रेची त्रयोदशीला झाली सांगता; त्रीलिंगी वनदेव महादेव मंदिर शिरदाळे येथे प्रदक्षिणा घेऊन केली जाते यात्रेची सांगता !!

Chief Editor

त्याचं नशीब बलवत्तर;अपघातात एअर बॅग उघडल्या म्हणून वाचले दोघांचे जीव, आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडीच्या वैदवाडी हद्दीत घडली दुर्घटना !!

Chief Editor

समर्थ कॉलेजमध्ये ड्रोन वर्कशॉप व ड्रोन स्पर्धा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment