सामाजिक

धामणी गावात नारी शक्ती बोलती झाली;महिला दिनी उलगडली स्वकर्तुत्वाची गाथा !!

img 20260308 wa0677
img 20260308 wa0677

पंचनामा संपादकीय – धामणी सारख्या खेडे गावामध्ये तुझा व्यवसाय कसा चालणार ?६० ते ६५ टक्के गाव बाहेर गेले आहे. हे ऐकून सुरुवातीला मी घाबरले. पण हिम्मत हरली नाही. मला संगणक येत नव्हता परंतु सुविधा केंद्र सुरू केले. हातात घेतलेले काम पूर्ण करायचे हा निर्धार ठेवून किंबहुना रात्री बारा वाजेपर्यंत जागले. परंतु काम करून दिले. आता काम करून देणारी बाई अशी माझी ओळख झाली आहे. सुवर्ण रोडे यांची ही जिद्द प्रेरणा देणारी ठरली.

माझा हॉटेल व्यवसाय. ..
प्रचंड कष्ट…सकाळी सात वाजता सुरुवात होते १२ तास काम…गेली ३२ वर्ष हॉटेल चालवते. कामातून मी उभी राहिले आज समाधानी असल्याचे सांगताना हिराबाई करंजखेले यांचा उर भरून आला.

मी डबल ग्रॅज्युएट. शहरात शिकले गावात आले. पहिल्यांदा किराणा दुकान सुरू केले. फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण हिम्मत ठेवली. नव्या जागेत दुकान सुरू केले. आज मी हिमतीने उभी आहे हे सांगताना रोहिणी जाधव यांचा आत्मविश्वास दुणावला.

हॉटेल व्यवसाय हा माझ्यासाठी नवा… शिरदाळे गावातून येऊन धामणी मध्ये हॉटेल चालवते. दिवसभर दमते परंतु कुटुंबाची आणि घरातल्या लोकांची साथ मला काम करण्याची उभारी देते. आज मी हॉटेलच्या व्यवसायात माझा ठसा उमटवत आहे. असा विश्वास मोहिनी तांबे यांनी जागवला.

या आणि अशा अनेक महिला बोलत्या झाल्या..

धामणी गावामध्ये हॉटेल असो की किराणा दुकान, टेलरिंगचे काम असो की गृहउद्योग. शेती असो की दूध व्यवसाय. एक महिला म्हणून व्यवसाय उद्योगांमध्ये स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभ्या असलेल्या आपल्या धामणी गावात स्वकर्तुत्वाने ठसा उमटवणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला.

जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने गतवर्षी आपल्या धामणी गावातील सेवार्थ भगिनींचा सन्मान केला होता. यावेळी उद्योग – व्यवसाय क्षेत्रामध्ये अहोरात्र कर्तव्य पार पाडणाऱ्या महिलांनी आपल्या स्वकर्तुत्वाची गाथा यावेळी ऐकवली. धामणीचे गावकरी आणि शिवतीर पतसंस्था यांनी नारी शक्तीचा गौरव करून त्यांच्यासाठी खुले व्यासपीठ निर्माण करून दिले होते. ३० महिलांनी आपल्या यशस्वी कारकिर्दीचे पैलू यावेळी बोलन दाखवले.

शिवतीर्थ पतसंस्थेचे चेअरमन ॲड.विठ्ठल जाधव यांनी महिला दिनाच्या या कार्यक्रमाची भूमिका मांडली.सरपंच अक्षय विधाटे, उपाध्यक्ष आनंदराव जाधव, माजी सरपंच सागर जाधव, अंकुश भूमकर, रुपेश विधाटे , मोहम्मद तांबोळी,
पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले यांनी महिलांच्या या कर्तव्याबद्दल गौरव उद्गार काढले.

गौरवास्पद नारीशक्ती !!
सायली गणेश रोकडे ,निलोफर सरदार इनामदार ,शैला श्रीकांत विधाटे ,हिराबाई दगडू करंजखेले,शालन वसंत यादव ,शबाना अस्पाक इनामदार, संगीता सुनील सासवडे ,सुवर्णा रोडे,
रुपाली रवींद्र वाघ, सुमित्रा रोकडे, संगीता दत्तात्रय जाधव, स्वाती ज्ञानेश्वर विधाटे,अलका विष्णू विधाटे, शबाना गुलाब इनामदार,संगीता ठकाराम भगत, नजमा पठाण, भावना ढगे, आशा शिवाजी भंडारकर,मनीषा सोमनाथ बोऱ्हाडे ,वैशाली नितीन जाधव मनीषा सुनील बोऱ्हाडे,संध्या राजेंद्र रोकडे, तनुजा रुपेश विधाटे ,मोहिनी स्वप्नील तांबे, सोनाली राहुल करंजखेले,रोहिणी संतोष जाधव, या कर्तबगार महिलांचा शिवतीर्थ पतसंस्थेतर्फे गौरव करण्यात आला.

img 20260308 wa0675
img 20260308 wa0673

Related posts

समर्थ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे खो-खो स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश !!

Chief Editor

डॉ.डी.वाय.पाटील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट, आकुर्डी, पुणेच्या विद्यार्थ्यांकडून जवळे (ता.आंबेगाव) गावात वृक्षारोपण उपक्रम उत्साहात संपन्न !!

Chief Editor

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जारकरवाडी ने संपादित केले उत्तुंग यश !!

Chief Editor

Leave a Comment