
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल, बांगरवाडी (बेल्हे), येथे आयोजित समर्थ बालमहोत्सव २०२६ (वार्षिक स्नेहसंमेलन) मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, जिल्हा परिषद माजी सदस्या स्नेहलताई शेळके, संचालिका सारिका ताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, समर्थ गुरुकुल चे प्राचार्य सतीश कुऱ्हे, समर्थ कॉम्प्युटर सायन्सचे प्राचार्य डॉ.उत्तम शेलार, डॉ. लक्ष्मण घोलप, समर्थ कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड मॅनेजमेंटचे प्राचार्य डॉ. नवनाथ नरवडे, प्रशासकीय अधिकारी प्रा. प्रदीप गाडेकर,समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संतोष घुले, समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ.अनिल कपिले, समर्थ ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर, समर्थ आयटीआय चे उपप्राचार्य विष्णू मापारी,समर्थ नर्सिंगच्या प्राचार्य ऐश्वर्या गटकळ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी बाल महोत्सव हा अत्यंत उपयुक्त उपक्रम असल्याचे मत स्नेहलताई शेळके यांनी व्यक्त केले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच सांस्कृतिक, क्रीडा आणि कलात्मक क्षेत्रात स्वतःची प्रतिभा सादर करण्याची संधी अशा कार्यक्रमांमधून मिळते, असे त्या म्हणाल्या.

बाल महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास वाढतो, संघभावना विकसित होते तसेच त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळते, असे मत कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत यांनी व्यक्त केले.
या बालमहोत्सवात विद्यार्थ्यांनी गायन, नृत्य, नाटिका आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे बहारदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा हा कार्यक्रम ठरला.

छोट्या कलाकारांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला.
समर्थ बालमोहसव कार्यक्रमाचे नियोजन प्राचार्य सतीश कु-हे व क्रीडा संचालक हरिश्चंद्र नरसुडे यांनी केले.प्रास्ताविक रामचंद्र मते,वार्षिक अहवाल वाचन पर्यवेक्षक सखाराम मातेले यांनी केले.कार्यक्रम यशस्वीते साठी शितल पाडेकर, मनीषा शेळके, प्रीती जाधव व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले तसेच उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


