सामाजिक

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,समाज भूषण कैलासराव गायकवाड यांना आंबेगाव भूषण पुरस्कार प्रदान !!

img 20260415 wa0414
img 20260415 wa0414

पंचनामा प्रतिनिधी- लोणी (ता. आंबेगाव) येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते,पत्रकार कैलासराव बबनराव गायकवाड यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुका, युगप्रवर्तक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य घोडेगाव ता.आंबेगाव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक व संविधान भवन समिती यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या१३५ व्या जयंतीच्या निमित्ताने देण्यात येणारा, प्रतिष्ठेचा आंबेगाव भूषण राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक दादा वळसे पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विजय शिंदे, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती कैलास बोआ काळे, कृषी उत्पन्न बाजार समिती आंबेगाव ची सभापती निलेश स्वामी थोरात,आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या उपसभापती ज्योतीताई पारधी, ज्येष्ठ पत्रकार डि के वळसे पाटील, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष नवनाथ हुले, संघाचे माजी अध्यक्ष आप्पा बोऱ्हाडे, सखारामजी घोडेकर, युगप्रवर्तक प्रतिष्ठान चे अध्यक्ष गौतमराव खरात, सचिव प्रकाश सोनवणे, विठ्ठल टिंगरे, गौतम रोकडेआदी मान्यवर उपस्थित होते.

दिव्यांगंचे पुनर्वसन, तळागाळातील वंचित समाजासाठी राहणीमान उंचवण्यासाठी भरीव कार्य, निराधार व विधवा स्त्रियांना संजय गांधी योजनेचा लाभ, दिव्यांग वर्गासाठी शस्त्रक्रिया, व्हील चेअर्स, कुबड्या, पांढरी काठी, डोळ्यांच्या ऑपरेशन्स, दिव्यांगांना सर्टिफिकेट व सवलतीचे पास, मानधन, कलावंतांना मानधन, भटक्या- विमुक्त समाजातील मुलांना वसतिगृह, विविध सरकारी योजना, पाबळ येथील मतिमंद मुलांची शाळा व वाघोली येथील भटक्या विमुक्त समाजातील मुलांची शाळा, आश्रम शाळा , बालगृह, मूकबधिर शाळा, वृद्धाश्रम व इतर समाजासाठी मौलिक काम करत आहेत. हे काम करताना त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने काम केले आहे. त्यांना या कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

आंबेगाव, खेड, शिरूर या भागातील दिव्यांग समुदया साठी समुदाय आधारित दिव्यांग पुनर्वसन या माध्यमातून अनेक दिव्यांगांना मदत केली आहे. बहुसंख्य तरुणांना रोजगार मिळवून दिले आहेत. त्यांच्या कामांचे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील,, माजी राज्यपाल के शंकर नारायण, माजी राज्यपाल कोश्यारी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अनेक मंत्र्यांच्या हस्ते त्याचा गौरव झाला आहे. आत्तापर्यंत त्यांना गोवा भूषण, कोकण भूषण, अक्कलकोट भूषण, तसेच अनेक संस्थांचे पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झालेला आहे.

fb img 1774661449199

पत्रकारिता क्षेत्रातही त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. आपल्या मातीतील माणसांनी राज्यस्तरीय आंबेगाव भूषण पुरस्कार देऊन माझा खूप मोठा सन्मान केल्याचे समाजभूषण, पत्रकार कैलासराव गायकवाड यांनी सांगितले.

Related posts

शिरदाळे (ता.आंबेगाव) येथे श्री शंभू महादेवाची प्राणप्रतिष्ठा मोठ्या उत्साहात संपन्न !!

Chief Editor

सिझन पूर्वी तमाशाची रूपरेषा आखून सर्वत्र त्याची अंमलबजावणी करावी – मा.मुसाभाई इनामदार

Chief Editor

पारगावमध्ये ‘माणुसकीची भिंत’ उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी!

Chief Editor

Leave a Comment