सामाजिक

अवकाळीने हिरावला बळीराजाच्या तोंडचा घास;लाखणगावात तीन एकर कलिंगडाची बाग उध्वस्त !!

img 20260407 wa0387

पंचनामा प्रतिनिधी – अवकाळी पावसाने बळीराजाच्या तोंडचा घास हिराऊन घेतला आहे.लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील शेतकरी विश्वनाथ रोडे यांची तीन एकरांवरील कलिंगडाची बाग अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. काढणीला आलेली फळे सडल्याने तसेच वेली जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

ही बाग नुकतीच तोडणीसाठी तयार झाली होती; मात्र अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या तडाख्यामुळे संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली. या घटनेत विश्वनाथ रोडे यांचे अंदाजे सहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

आधीच युद्धजन्य परिस्थितीमुळे बाजारभाव घसरले होते. त्यातच अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला असून हतबल झाला आहे.

या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत. डोळ्यादेखत तयार झालेला शेतीमाल अस्मानी संकटामुळे नष्ट झाला असून कष्टाने फुलवलेल्या पिकांची नासधूस झाल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आहेत.

img 20260407 wa0375

दरम्यान, लाखणगाव येथीलच शेतकरी शिवाजी रोडे यांनी एक एकर क्षेत्रात पपईची लागवड केली होती. पपई तोडणीला आली होती त्यांच्या पिकालाही अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा फटका बसून पपईची बाग उद्ध्वस्त झाली आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने पंचनामे करून अधिकाधिक आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहे.

fb img 1774661444136

Related posts

निरगुडसर येथे कृषीकन्यांचे उत्साहात स्वागत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी सात आठवडे शेतकऱ्यांसोबत राहून करणार मार्गदर्शन !!

Chief Editor

समर्थ मध्ये सायबर गुन्हे व सुरक्षा या विषयावर तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन ;डिजिटल अरेस्ट म्हणजे सायबर फसवणूक- एच.डी.एफ.सी बँकचे क्लस्टर हेड रोहित तेंडुलकर यांचे प्रतिपादन

Chief Editor

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगवे (पारगाव) येथे विज्ञानप्रदर्शन संपन्न !!

Chief Editor

Leave a Comment