सामाजिक

निरगुडसर येथे कृषीकन्यांचे उत्साहात स्वागत ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमासाठी सात आठवडे शेतकऱ्यांसोबत राहून करणार मार्गदर्शन !!

1009767788
1009767782

पंचनामा प्रतिनिधी – निरगुडसर ( ता.आंबेगाव) येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत डॉ. डी. वाय. पाटील कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, आकुर्डी येथील कृषीकन्यांचे निरगुडसर येथे उत्साहात स्वागत करण्यात आले.

ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत या कृषीकन्या पुढील सात आठवडे गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.डी.जगताप, उपप्राचार्य व समन्वयक डॉ. एस.एन.पाटील तसेच प्रा.भक्ती चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

कृषीकन्यांमध्ये स्नेहल नेहुल,भाग्यश्री नंदीवाले,श्रद्धा निकम,आरती गावित,अंशुज इंगोले आणि हर्षिता एरुगुराला यांचा समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान माती परीक्षण,पाणी व्यवस्थापन, पीक संरक्षण,कीड व रोग नियंत्रण,आधुनिक शेती तंत्रज्ञान,शेतीमाल प्रक्रिया व विपणन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कृषीकन्यांच्या माध्यमातून गावात वैज्ञानिक पद्धतीची शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.

यावेळी निरगुडसरचे सरपंच रविंद्र वळसे पाटील, ग्रामविकास अधिकारी संपत पांढरे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.ग्रामस्थांनी कृषीकन्यांचे स्वागत करून त्यांच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.

निरगुडसर (ता.आंबेगाव) येथे कृषी कन्यांचे स्वागत करताना सरपंच रविंद्र वळसे पाटील व इतर मान्यवर.

92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 353520
1009760330
1009760332

Related posts

बी. जे. एस. विद्यालय वाघोली येथील डॉ.विष्णू देवडकर विद्यापीठाच्या (Ph.D.) पदवी ने सन्मानित !!

Chief Editor

बादोल्यात रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांचा ५८ हजार रुपयांचा नोटाचा हार घालून अनोखा वाढदिवस साजरा !!

Chief Editor

जारकरवाडी सोसायटीकडुन पीककर्ज वाटप !!

Chief Editor

Leave a Comment