सामाजिक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६जिल्ह्यात ४३ हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी केले आधार प्रमाणीकरण- जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप

1010380787
1010380787

पंचनामा प्रतिनिधी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत काल अखेर ४३ हजार ३७१ इतक्या शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केंद्रावर जावून आपले आधार प्रमाणीकरण करुन घेतले आहे. आधार प्रमाणीकरण करुन घेतल्यानंतरच त्यांच्या कर्जखात्यात रक्कम जमा होणार आहे, तसेच नवीन पीक कर्ज घेण्यासही शेतकरी पात्र होणार आहेत. त्यामुळे आपले आधार प्रमाणीकरण करुन करुन घ्यावे, असे पुणे ग्रामीण सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्रकाश जगताप यांनी केले आहे.

कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे १ लाख ८ हजार ३० आणि विविध वाणिज्य बँकेचे १७ हजार अशी एकूण १ लाख २२ हजार ७८६ इतक्या खात्याची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या यादीमध्ये ६४ हजार ६६४ शेतकरी कर्जमुक्ती योजनेकरिता पात्र झाले आहेत, अशी माहिती श्री. जगताप यांनी दिली आहे.

Related posts

समर्थ फार्मसी च्या विद्यार्थ्यांचे खो-खो स्पर्धेमध्ये दैदीप्यमान यश !!

Chief Editor

महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांची जयंती ग्रामपंचायत जवळे येथे संपन्न..

Chief Editor

डॉ. अलेक्झांडर गिबसन समाधी – भारतीय वनसंवर्धनाचा प्रेरणादायी वारसा !!

Chief Editor

Leave a Comment