
पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे या दोन्ही औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन,आळेफाटा स्थानिय शाखा यांच्या माध्यमातून आयोजित राज्यस्तरीय विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याची माहिती प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके व डॉ.संतोष घुले यांनी दिली.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील विद्यार्थ्यांसाठी भव्य पारितोषिक वितरण सोहळा जयहिंद एज्युकेशनल कॅम्पस, कुरण-वडगाव सहानी येथे पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. अतुल आहिरे (अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल) अॅड. डॉ. सचिन कोतवाल (अध्यक्ष, NPWA)उपस्थित होते.
समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे व समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे या महाविद्यालयांचे इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन आळेफाटा स्थानिय शाखा आयोजित२०२५-२०२६ वर्षातील विविध स्पर्धांचे निकाल.
स्पर्धा: खो- खो (मुले)
आयोजक: समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे.
प्रथम क्रमांक: समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे
द्वितीय क्रमांक: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे.
स्पर्धा: खो- खो (मुली)
आयोजक: जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी.
प्रथम क्रमांक: समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे.
स्पर्धा: क्रिकेट (मुले)
आयोजक: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे.
प्रथम क्रमांक: समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे.
द्वितीय क्रमांक: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बेल्हे.
स्पर्धा – कबड्डी (मुले)
आयोजक- विशाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी आळे
द्वितीय क्रमांक- समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे
स्पर्धा -थ्रो बॉल (मुली)
आयोजक- श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी माळवाडी बोटा
द्वितीय क्रमांक- समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे
स्पर्धा: हॉलिबॉल (मुले)
आयोजक: श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, माळवाडी बोटा.
प्रथम क्रमांक: समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे
स्पर्धा: पोस्टर सादरीकरण
आयोजक: विशाल जुन्नर सेवा मंडळ, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, आळे.
द्वितीय क्रमांक: कु. मानसी वणवे, कु. रेश्मा तांबोळी (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे)
तृतीय क्रमांक: कु. वैष्णवी मोरे, कु. चौधरी तृप्ती (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे)
स्पर्धा: प्रश्नमंजुषा स्पर्धा
आयोजक: समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे.
द्वितीय क्रमांक: कु. पायल केंबारी, कु. अंकिता तोडकर (समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी, बेल्हे.)
तृतीय क्रमांक: कु. स्नेहा यादव , प्रसाद डोईफोडे (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे)
वादविवाद स्पर्धा
आयोजक- जय हिंद कॉलेज ऑफ फार्मसी.
द्वितीय क्रमांक- प्रवीण हांडे, यशराज गावडे (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे)
पेपर सादरीकरण स्पर्धा
आयोजक -श्री स्वामी समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बोटा
द्वितीय क्रमांक-शिवराज मंडलिक आणि कशिश लांडे (समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी बेल्हे)
या शिवाय बॅडमिंटन,मॉडेल एक्स्पो,प्रश्नमंजुषा,वादविवाद, पेपर सादरीकरण व थ्रोबॉल स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके,प्राचार्य डॉ.संतोष घुले,क्रीडा संचालक एच.पी.नरसुडे,डॉ.शरद पारखे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच सर्व प्राचार्य व विभागप्रमुख यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


