सामाजिक

ज्योती गोरडे यांना स्वामी विवेकानंद युवा उद्योजक पुरस्कार जाहीर !!

img 20260409 wa0543

पंचनामा प्रतिनिधी – लोणी (ता.आंबेगाव) येथील प्रगती डाळ मिलच्या उद्योजिका ज्योती अरुण गोरडे यांना युगप्रवर्तक प्रतिष्ठान घोडेगाव (ता.आंबेगाव ) यांचा स्वामी विवेकानंद युवा उद्योजक हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

img 20260409 wa0520

दिव्यांगांचे पुनर्वसन, तळागाळातील वंचित समाजासाठी राहणीमान उंचवण्यासाठी भरीव कार्य, निराधार व विधवा स्त्रियांना संजय गांधी योजनेचा लाभ, दिव्यांग वर्गासाठी शस्त्रक्रिया, श्रावण बाळ योजना, डोळ्यांच्या ऑपरेशन्स, दिव्यांगांना सर्टिफिकेट व सवलतीचे पास, मानधन व बचत गटासाठी कार्य तसेच आपल्या उद्योगाच्या माध्यमातून आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त स्त्रियांना प्रशिक्षण दिले.

त्या इतर समाजासाठी सुद्धा मौलिक काम करत आहेत. हे काम करताना त्यांनी कुठलीही अपेक्षा न ठेवता निरपेक्ष भावनेने काम केले आहे. त्यांना या कामासाठी हा पुरस्कार मिळाला आहे.

स्वामी विवेकानंद युवा उद्योजक हा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन
युगप्रवर्तक प्रतिष्ठान घोडेगाव यांनी माझा मोठा सन्मान केल्याचे ज्योती गोरडे यांनी सांगितले.

fb img 1774661444136

Related posts

सौ.गायत्री नचिकेत अवधानी ( राजगुरव ) यांची “मानद वन्यजीव रक्षक ” या पदी नियुक्ती !!

Chief Editor

काठापुर बुद्रुक (ता.आंबेगाव) येथील वनविभागातील अतिक्रमणे हटवली !!

Chief Editor

कु. मयुरी शरद खाडे हिचे विज्ञान शाखेत घवघवीत यश

Chief Editor

Leave a Comment