सामाजिक

संत निरंकारी मिशन-राजेवाडी शाखेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३७४ जणांनी केले मानवतेप्रती रक्तदान…

1010262822
1010262840

सासवड (ता पुरंदर, पुणे) : संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशनच्या वतीने राजेवाडी येथे आयोजित करण्यात आलेले भव्य रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले. रविवार, १९ जुलै २०२६ रोजी झालेल्या या शिबिरात नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत एकूण ३७४ युनिट रक्त संकलन करण्यात आले.

या रक्तदान शिबिरासाठी मिशनचे अनुयायी तसेच ( Sant Nirankari Mission) परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ससून शासकीय रुग्णालय रक्तपेढीने १११ युनिट, औंध रुग्णालय रक्तपेढी ९७ युनिट तर संत निरंकारी रक्तपेढी, विलेपार्ले (मुंबई) यांनी १६५ युनिट रक्त संकलन केले.

संत निरंकारी मिशनच्या कार्यातून मानवतेचा संदेश देण्यात येत असून “रक्त नाल्यांमध्ये नाही, तर नाड्यांमध्ये वाहिले पाहिजे” हा संदेश या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला. आध्यात्मिकतेच्या माध्यमातून समाजात एकता, प्रेम आणि सौहार्द निर्माण करण्याचा मिशनचा उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

राजेवाडी, सासवड परिसरात मिशनतर्फे वेळोवेळी( Sant Nirankari Mission) स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, आरोग्य सह नेत्र तपासणी शिबिरे आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. या सामाजिक कार्यासाठी मिशनला केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेकदा गौरविण्यात आले आहे.

या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी संत निरंकारी सेवादल आणि मिशनच्या अनुयायांचे विशेष योगदान लाभले. तसेच रक्तदानाबाबत जनजागृती करण्यासाठी परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांना प्रेरित करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन पुरंदर पंचायत समितीचे सभापती अमितभाऊ झेंडे आणि मिशनचे ब्रह्मज्ञान प्रचारक अशोकजी कोऱ्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर सह पत्रकार बांधव तसेच स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित शेवटी स्थानिक शाखा प्रमुख हनुमंत थोरात यांनी रक्तदाते आणि मान्यवरांचे आभार मानले.

1009850407

Related posts

शिरदाळे(ता.आंबेगाव) येथे ज्वारी पिक काढणीला सुरवात !!

Chief Editor

नवसाला पावणारी करवडीची जानुबाई आणि सलग ४० वर्षे नवस फेडणारी तमाशा सम्राज्ञी मंगलताई !!

Chief Editor

मुक्तादेवी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांना वय वंदना कार्डचे वाटप !!

Chief Editor

Leave a Comment