सामाजिक

जवळे (ता.आंबेगाव) गावाने महिलांसाठी राबविला नाविन्यपूर्ण उपक्रम!!

img 20251230 wa0303

पंचनामा पारगाव (शिंगवे) प्रतिनिधी – विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील जवळे गावाने महिलांसाठी अनोखा उपक्रम राबवला आहे.

img 20251230 wa0304

मौजे जवळे या ठिकाणी मुख्यमंत्री पंचायत राज अभियान निमित्त नाविन्यपूर्ण उपक्रम मध्ये ग्रामपंचायत जवळेच्या माध्यमातून महिला भगिनींना मोफत पापड बनवण्यासाठी मशीन उपलब्ध करण्यात आलेली आहे.यामध्ये आपण आपल्या घरून सर्व सामग्री घेऊन यावी व ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी मोफत पापड बनवून घरी घेऊन जायचे आहेत अशी माहिती ग्रामपंचायतचे आदर्श सरपंच वृषालीताई उत्तम शिंदे पाटील यांनी दिली.

यावेळी यशदाचे ट्रेनर बाजारे सर , समवेत लता मेंगडे, ग्रामपंचायत अधिकारी शीला साबळे, दत्तात्रय लायगुडे, चंद्रकला गायकवाड, शुभांगी खालकर, सुरेखा खालकर, प्रमिला गावडे, सगीता साबळे, हरिचंद्र शिंदे, अमोल वाळुंज, प्रकाश खिलारी,सुनंदा शिंदे, कविता शिंदे, सुप्रिया वाळुंज संगीता वाळुंज शालन सोनवणे, कल्पना खालकर, मोनिका गावडे, अनिता वाळुंज, चंद्रकला टाव्हरे , दळे आदी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

img 20251230 wa0305
img 20251230 wa0231

Related posts

निधन वार्ता – कै.सौ.कलाबाई नामदेव सुक्रे यांचे अल्पशा आजाराने निधन..

Chief Editor

संतोषचा प्रेरणादायी पत्रकारितेचा प्रवास !!

Chief Editor

उन्हाच्या झळा झाल्या तीव्र; आठवडे बाजारात ग्राहकांचा शुकशुकाट !!

Chief Editor

Leave a Comment