सामाजिक

निरगुडसरमध्ये बिबट्याची दहशत ; आठ दिवसांत दोघांवर हल्ले थोरात मळ्यात बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाचा पिंजरा ; पिंजऱ्यात कोंबडा ठेवूनही बिबट्या हुलकावणी देत असल्याने चिंता वाढली !!

img 20261115 wa0559
1011233703

पंचनामा प्रतिनिधी – निरगुडसर (ता. आंबेगाव) येथील थोरात मळा परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून, गेल्या आठ दिवसांत बिबट्याने दोन नागरिकांवर जीवघेणे हल्ले केले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने थोरात मळा येथे पिंजरा लावला आहे.

बिबट्याला पिंजऱ्यात आकर्षित करण्यासाठी वनविभागाने पिंजऱ्यात कोंबडा ठेवला आहे. मात्र, बिबट्या पिंजऱ्याच्या आसपासही फिरकत नसल्याने त्याला पकडण्याचे आव्हान वनविभागासमोर उभे राहिले आहे. पिंजऱ्यात ठेवलेल्या कोंबड्याची परिसरात चांगलीच चर्चा रंगली असली, तरी बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

थोरात मळा परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याच्या हालचाली वाढल्या आहेत. शेतीकामासाठी शेतात जाणारे शेतकरी, महिला व नागरिकांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोकादायक बनले आहे.

बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करा!

गेल्या आठ दिवसांत दोन नागरिकांवर हल्ले होऊनही बिबट्या मोकाट फिरत असल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. आणखी एखादी गंभीर घटना घडण्यापूर्वी वनविभागाने बिबट्याला जेरबंद करावे, तसेच परिसरात गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

1011705467
1011703635

Related posts

समर्थ फार्मसी विद्यार्थ्यांची पुण्यातील नामांकित कंपनीत घवघवीत भरारी ;सिलिकंट प्रा. लि. मध्ये २६ विद्यार्थ्यांची निवड !!

Chief Editor

जालिंदरभाऊ म्हणजे धडाडी;धामणी गावासाठी योगदान !!

Chief Editor

जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत केली आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागाची पाहणी !!

Chief Editor

Leave a Comment