सामाजिक

जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत केली आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागाची पाहणी !!

img 20260707 wa0442

पंचनामा प्रतिनिधी – आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात गेले दोन दिवसापासून अधून-मधून मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी प्रशासकीय अधिका-यांसह पोखरी (बेंढारवाडी), जांभोरी येथील काळवाडी क्र.१, क्र. २ तसेच माळीण (पसारवाडी), पंचाळे, अडीवरे भागात स्थानिक शेतकऱ्यांना भेटून संवाद साधला.

1010089510

हवामान विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पावसाचा जोर वाढू शकतो, त्या अनुषंगाने येथील स्थानिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित राहण्यास शासनास सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी यावेळी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार, विद्यमान उपमुख्यमंत्री मा.श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे मा.सहकारमंत्री मा.ना. दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आदिवासी भागातील डोंगराळ भागातील वाडी-वस्त्यांचे पुनर्वसनाचे काम प्रगतीपथावर आहे. या नागरिकांना घरकुले मंजूर असून अनेक ठिकाणी जागेचे सपाटीकरण, जोडरस्ते देखील पुर्ण झाले आहेत.

1010089505
1010089503
1010089501

यावेळी आंबेगाव -जुन्नर उपविभागीय अधिकारी श्रीमती अर्चना तांबे, तहसीलदार श्री. सचिन वाघ, माजी सभापती प्रकाशराव घोलप, तालुका पं.स उपसभापती ज्योती पारधी, आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी श्रीमती प्रमिला वाळुंज, जांभोरी गावच्या लोकनियुक्त सरपंच सुनंदा पारधी,आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शामराव बांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवानेते मारुती दादा केंगले ,सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पारधी, माजी उपसरपंच किसन पारधी, जांभोरी आदिवासी वि. का. सो. चेअरमन नामदेव दांगट,तालुका ख-वि संघाचे माजी अध्यक्ष रमेशशेठ खिलारी, प्रविण पारधी, सार्वजनिक बांधकाम विभाग घोडेगाव उपभियंता श्री.कुंभार, यांसह स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts

श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९२ च्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न !!

Chief Editor

डॉ. हेमंतकुमार डुंबरे डॉक्टरेट पदवीने सन्मानीत ;राष्ट्रपती भेटीचे निमंत्रण” !!

Chief Editor

शिंगवे (पारगाव) येथील बिबट्या अखेर जेरबंद !!

Chief Editor

Leave a Comment