
गुपंचनामा प्रतिनिधी – गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती आणि विद्यार्थीकेंद्रित शैक्षणिक उपक्रमांच्या बळावर समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ पॉलीटेक्निक, बेल्हे व समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी ,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म)यांनी आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई) यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी घेण्यात आलेल्या बाह्य शैक्षणिक निरीक्षणामध्ये संस्थेच्या पॉलिटेक्निक विभागातील(मेकॅट्रॉनिक्स, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) तसेच फार्मसी च्या (डी फार्म)या विभागांना ‘व्हेरी गुड’ मानांकन प्राप्त झाले आहे.
एमएसबीटीईमार्फत संलग्न तंत्रनिकेतनांमधील अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, अध्यापन-अध्ययन प्रक्रिया, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन, प्रयोगशाळा व ग्रंथालय सुविधा, पायाभूत सुविधा, शिक्षकांची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करण्यासाठी बाह्य शैक्षणिक निरीक्षण केले जाते. या निरीक्षणासाठी एमएसबीटीईने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ निरीक्षक समितीने समर्थ पॉलीटेक्निक व फार्मसीच्या विविध विभागांचे सखोल परीक्षण केले.
निरीक्षणानंतर पॉलिटेक्निक व फार्मसी सर्व निकषांवर उत्कृष्ट कामगिरी करत ‘व्हेरी गुड’ मानांकन मिळाल्यामुळे या वर्षातील पॉलिटेक्निक व फार्मसी प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयाविषयी विद्यार्थी व पालकांमध्ये विश्वास अधिक दृढ होत असून दर्जेदार शिक्षणासाठी समर्थ महाविद्यालयाला विद्यार्थी पालकांची पसंती मिळत आहे.
या उल्लेखनीय यशामागे समर्थ पॉलिटेक्निक चे प्राचार्य डॉ. अनिल कपिले, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.कुलदीप रामटेके, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. संतोष घुले उपप्राचार्य संजय कंधारे तसेच अकॅडमिक को-ऑर्डिनेटर शामकुमार फुलपगारे यांचे प्रभावी नेतृत्व लाभले. याशिवाय प्रा. संदीप त्रिभुवन, प्रा. संकेत विघे, प्रा. स्वप्निल नवले, प्रा. आशिष झाडोकार, प्रा. महेंद्र खटाटे, प्रा. आदिनाथ सातपुते,डॉ. नंदकिशोर मुऱ्हेकर यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समर्पित प्रयत्नांचे मोलाचे योगदान लाभले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, मा.जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर तसेच संकुलातील सर्व विभागाचे प्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

