सामाजिक

भीमाशंकरकडून रु.१७७/- प्रमाणे रक्कम बँकेत जमा !!

1010907248
1010907248

पंचनामा प्रतिनिधी – दत्तात्रयनगर, पारगाव तर्फे अवसरी बु, (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ गाळप हंगामामध्ये गाळप केलेल्या ८,८३,०६९ मे.टन ऊसास रु.१७७/- प्रती मे. टनाप्रमाणे रक्कम रु. १५ कोटी ६३ लाख ३ हजार सोमवार (२६ ऑक्टोबर) रोजी ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग केली असल्याची माहीती कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे यांनी दिली.

कारखान्याचे संस्थापक-संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा.आ.श्री. दिलीपराव वळसे पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मा. संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार गाळप हंगाम २०२५-२६ मध्ये कार्यक्षेत्र व परिसरातील गाळप केलेल्या एकूण ८,८३,०६९ मे. टन ऊसासाठी रु. ३,५००/- प्रती मे.टन अंतिम ऊस दर जाहीर केलेला आहे. अदा केलेला ऊस दर वजा जाता देय असलेली उर्वरित रक्कम रु. १७७/- प्रती मे. टनाप्रमाणे होणारी रक्कम रु. १५ कोटी ६३ लाख ३ हजार ऊस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे. दिपावलीपूर्वी शेतक-यांच्या बँक खात्यावर अंतिम हप्त्याची रक्कम वर्ग करून जाहीर केल्याप्रमाणे दिलेला शब्द पूर्ण केला आहे.

1010907453
कारखान्याने एफ.आर.पी.ची रक्कम नेहमीच वेळेत दिलेली आहे. याशिवाय वाढीव रक्कम      अंतिम हप्त्याचे स्वरुपात ऊस उत्पादक शेतक-यांना दिलेली असल्याने ऊस उत्पादक शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. भीमाशंकर कारखान्याने आजपर्यंत सभासद, बिगर सभासद व गेटकेन अशा प्रकारचा कोणताही भेदभाव न करता सर्वांना समान ऊस दर देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.

 गाळप हंगाम २०२६-२७ मधील संपूर्ण ऊसाचे गाळप करण्याचे पूर्ण नियोजन केले आहे. त्यासाठी ऊस तोड व वाहतूक यंत्रणा हजर झालेली असून कारखाना पुर्ण क्षमतेने गाळप करीत आहे. कार्यक्षेत्र व परिसरातील सर्व ऊस उत्पादक शेतक-यांनी भीमाशंकर कारखान्यास आपला ऊस देवून पुर्वीप्रमाणेच सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील यांनी केले.
92f4d25e 9686 4a0e aeae dca8fbad0e88 1 all 399503

Related posts

स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आंबेगाव तालुक्यात ‘जनसेवा सप्ताह’ उत्साहात साजरा होणार; विविध सामाजिक व आरोग्य उपक्रमांचे आयोजन

Chief Editor

निरगुडसर विद्यालयाच्या १४ वर्षांखालील क्रिकेट संघाचा तालुक्यात प्रथम क्रमांक ; जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी संघाची निवड !!

Chief Editor

राज्य शासनाच्या वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी व्हा;राज्य शासनाचे सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट- -उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

Chief Editor

Leave a Comment