सामाजिक

समर्थ नर्सिंग महाविद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम !!

1011477462
1011477462

पंचनामा प्रतिनिधी – समर्थ रुरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग, जी.एन.एम. महाविद्यालय, बंगरवाडी-बेल्हे येथील प्रथम वर्ष जी.एन.एम. (२०२५-२६) परीक्षेत विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य ऐश्वर्या गटकळ यांनी दिली. या परीक्षेत मोहिनी लोणके हिने ४०० गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला, तर पूर्वा शेळके हिने ३९७ गुणांसह द्वितीय क्रमांक मिळवला. माधुरी गाडेकर, काजल कसबे आणि प्रतीक्षा दाभाडे यांनी प्रत्येकी ३८७ गुण मिळवत संयुक्तपणे तृतीय क्रमांक मिळवला. या यशामुळे महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.

या परीक्षेत वैष्णवी आनंदराव, रुपाली हिंगे, अंकिता अग्रे, दिशा पोखरकर, साक्षी आधारी, या विद्यार्थ्यांनीही  परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य  मिळविले आहे.गुणवंत विद्यार्थिनींच्या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे.

विद्यार्थिनींच्या या यशामागे त्यांची मेहनत, अभ्यासातील सातत्य, तसेच हर्षदा गोफणे,आयेशा जमादार, सानिया शेख, उज्वला साळवे स्नेहल येवले या शिक्षकांचे मार्गदर्शन आणि महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सुविधांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. नर्सिंग शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थिनींना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे, तर रुग्णसेवेची भावना, शिस्त, जबाबदारी आणि व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी महाविद्यालयात मार्गदर्शन केले जाते.

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके, उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके माजी जिल्हा परिषद सदस्य स्नेहलताई शेळके, कॅम्पस डायरेक्टर राजीव सावंत, प्रशासकीय अधिकारी प्रा प्रदीप गाडेकर, यशवंत फापाळे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थिनींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.        विद्यार्थिनींनी मिळवलेले यश हे त्यांच्या मेहनतीचे, शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे आणि संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या प्रयत्नांचे फलित आहे.
1011423306

Related posts

बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेटा चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पारगाव (कारखाना) पोलिसांनी जेरबंद करून एकुण ३७ प्लेटा केल्या जप्त;पारगाव पोलीसांची उत्तम कमगिरी !!

Chief Editor

भोरवाडीच्या कु.विधी नंदकुमार भोर या कन्येने आंबेगाव तालुक्याच्या शिरपेचात रोवला आणखी एक मानाचा तुरा !!

Chief Editor

लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील शालेय विद्यार्थ्यांना ट्रेसेबल गिव्हींग फाउंडेशनच्या वतीने ६३०००/- रुपये किमतीच्या पाठ्यपुस्तकांचे मोफत वाटप !!

Chief Editor

Leave a Comment